फोटो सौजन्य - JIO Cinema सोशल मीडिया
बिग बॉस १८ : बिग बॉसच्या घरामध्ये सध्या १८ सदस्य आहेत, यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये कोणत्याही सदस्याला घरचा कॅप्टन बनवण्यात आले नाही. कालच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये वाद पाहायला मिळाले. त्यानंतर बिग बॉसने घरामधील सदस्यांना एक टास्क दिला होता यामध्ये त्यांना घराचा पहिला कॅप्टन बनवायचे होते. यावेळी बिग बॉसने घरातल्या कॅप्टनचे नाव ‘टाइम गॉड’ असे ठेवले आहे. कारण जो कोणी या घराचा ‘टाइम गॉड’ बनेल त्याला कॅप्टनला दिलेल्या विशेष अधिकारासोबत वरदानही मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे वरदान असणार आहे असे बिग बॉसने सदस्यांना सांगितले आहे. या नव्या सीझनचा पहिला कॅप्टन कोण ठरला यावर एकदा नजर टाका.
प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये, बिग बॉसने कॅप्टन्सी टास्कसाठी घरातील सदस्यांना ॲक्टिव्हिटी रूममध्ये बोलावले. त्यानंतर बिग बॉसने घरातील सदस्यांना सांगितले, ‘आज एका सदस्याला वरदान मिळणार आहे. वेळेवर नियंत्रण ठेवण्याचे हे वरदान आहे. देव बनण्याची वेळ आहे. आज जोही सदस्य टाइम गॉड होईल त्याला या घराचे भूतकाळातील निर्णय बदलण्याचे वरदान मिळेल. वेळ देव या घराचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य बदलेल. यानंतर, बिग बॉसने घरातील सदस्यांना एक-एक करून अशा सदस्यांची नावे सांगण्यास सांगितले जे त्यांना “टाइम गॉड” बनण्यास पात्र नाहीत.
Kaun banega Time God aur karlega past, present, aur future jaanne ka adhikaar haasil? 🧐
Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #BlueHeavenCosmetics #Harpic… pic.twitter.com/0D3F8XK97f
— ColorsTV (@ColorsTV) October 14, 2024
टास्क सुरू झाल्यानंतर, तजिंदर, गुणरतन, शिल्पा, शहजादा, सारा, चाहत, ईशा, करण आणि श्रुतिका पहिल्या फेरीत ‘टाइम गॉड’ बनण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले. दुसऱ्या फेरीत मुस्कान, अविनाश, ॲलिस, विवियन, हेमा, रजत, नायरा आणि चुम हे बाहेर पडले. अशा परिस्थितीत अरफीन खानला ‘बिग बॉस १८’ चा पहिला कॅप्टन म्हणजेच पहिल्यांदाच देव बनवण्यात आले. आता आरफीन बिग बॉसच्या घराचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य बदलणार आहे. घरातील बाकीच्यांवर याचा काय परिणाम होईल? हे पाहणं मनोरंजक ठरेल.