(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘सितार जमीन पर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. दरम्यान, सुपरस्टारने एका कार्यक्रमात हजेरी लावली जिथे त्याने त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’ बद्दल बोलताना दिसला आहे. तसेच, अभिनेत्याला पडद्यावर कोणते पात्र साकारायला आवडेल हे देखील सांगितले आहे. आमिर खानला ‘महाभारत’वर चित्रपट बनवायचा आहे अशी चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे.
Operation Sindoor नंतर जिओ हॉटस्टार सर्व्हर झाले होते हॅक ? अधिकृत निवेदन आले समोर!
महाभारताबद्दल आमिर खान नेमकं काय म्हणाला?
एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या सुपरस्टार आमिर खानला ‘महाभारत’ चित्रपटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘महाभारतावर चित्रपट बनवणे हे माझे स्वप्न आहे. हे एक कठीण स्वप्न आहे. महाभारत तुम्हाला कधीही निराश करू शकत नाही पण तुम्ही महाभारताला निराश करू शकता.’ असं अभिनेता या मुखातील बोलताना दिसत आहे.
तुम्हाला कोणते पात्र साकारायला आवडेल?
चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना आमिर खान म्हणाला की, ‘सितार जमीन पर’ नंतर अभिनेता ‘महाभारत’ चित्रपटावर काम सुरू करणार आहे. आमिर म्हणाला, ‘मी प्रयत्न करतोय.’ हा एक मोठा प्रकल्प आहे. यामुळे, मी जास्त काही बोलू इच्छित नाही. जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याला या चित्रपटात कोणते पात्र साकारायला आवडेल? यावर आमिर खान म्हणतो, ‘मला भगवान कृष्णाचे पात्र आवडते. ‘मी त्यांच्यापासून प्रेरित आहे. म्हणूनच मला हे पात्र साकारायला आवडेल.’ असं त्यांनी म्हटले.
हा चित्रपट अनेक भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
आमिर खानच्या ‘महाभारत’चा उल्लेख यापूर्वीही अनेकदा झाला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले होते की ते हा चित्रपट अनेक भागांमध्ये प्रदर्शित करणार आहे पण ते सर्व एकाच वेळी शूट केले जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटानंतर आमिर खान बऱ्याच काळानंतर ‘सितार जमीन पर’ चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. अभिनेत्याला पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.