(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
पाकिस्तानवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर, भारताच्या या चोख उत्तराचे सर्वजण कौतुक करत आहेत. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले. दरम्यान, पाकिस्तानी हॅकर्सनी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारचा मेल सर्व्हर हॅक केल्याची बातमी समोर आली. ही बातमी समोर येताच, चाहत्यांनी उपस्थित केलेला पहिला प्रश्न म्हणजे आयपीएल २०२५ च्या स्ट्रीमिंगवर परिणाम होईल का? तसेच, आता जिओ हॉटस्टार टीमकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे, ज्यामध्ये या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.
आमचे मुख्य सर्व्हर पूर्णपणे सुरक्षित आहे.
जिओ हॉटस्टार टीमने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे, ज्यात लिहिले आहे की, ‘आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की काही प्रादेशिक प्रकाशनांमध्ये जिओस्टारच्या आयटी सिस्टमवर सायबर हॅक झाल्याचा दावा करणारे वृत्त पूर्णपणे खोटे आणि निराधार आहे. आम्ही आमच्या सर्व वापरकर्त्यांना आणि भागीदारांना खात्री देऊ इच्छितो की आमचे मुख्य सर्व्हर पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्याच्यावर कोणत्याही प्रकारे परिणाम झालेला नाही.
वापरकर्त्यांचा विश्वास जपणे ही पहिली प्राथमिकता आहे
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘सर्व यूजर्सचा डेटा आणि स्ट्रीमिंग सेवा पूर्णपणे सुरक्षित आहेत. आमच्या प्लॅटफॉर्मच्या कामकाजात कोणताही व्यत्यय आलेला नाही. जिओस्टारवरील सर्व क्रीडा आणि मनोरंजन स्ट्रीमिंग सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. जिओस्टारमध्ये, वापरकर्त्यांचा विश्वास जपणे ही आमची पहिली जबाबदारी आहे. आम्ही सायबर सुरक्षेचे सर्वोच्च मानक राखण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि भविष्यातील कोणत्याही धोक्यांना रोखण्यासाठी आमच्या प्रणालींचे सक्रियपणे निरीक्षण करत राहू.’ असे त्यांनी म्हटले आहे.
मे महिन्यात ओटीटीवर मिळणार दमदार चित्रपट आणि वेबसीरीजची मेजवानी; वाचा यादी
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अलिकडेच एका वृत्तात असे म्हटले गेले होते की पाकिस्तानी हॅकर्सनी जिओ हॉटस्टारचा मेल सर्व्हर हॅक केला आहे. तसेच, आता यावर एक अधिकृत विधान समोर आले आहे, ज्यामुळे सर्व गोंधळ दूर झाला आहे. हे उल्लेखनीय आहे की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानच्या बहावलपूर आणि सियालकोटमधील अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. आणि भारतीयांना मोठा दिसला मिळाला आहे.