Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब… विठोबा बोलू लागला! प्रभाकर मोरे यांचे बालनाट्य; ‘नवीन प्रयोग, नवी भाषा’ मिळणार खास संदेश

गेली अनेक वर्षे ‘हास्यजत्रा’त कोकणी व्यक्तिरेखेमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते प्रभाकर मोरे आता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. ‘

  • By अमृता यादव
Updated On: Apr 11, 2026 | 08:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘हास्यजत्रा’मधून कोकणी व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते प्रभाकर मोरे आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘अबब विठोबा बोलू लागला’ या लोकप्रिय बालनाट्यात ते पहिल्यांदाच काम करत असून पुजाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. या भूमिकेसाठी त्यांनी प्रमाण मराठीत संवाद बोलण्याचे आव्हानही यशस्वीपणे पेलले आहे.हे गाजलेले बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर येत असून प्रेक्षकांना हसवण्यास सज्ज आहे. या नाटकाचे दिग्दर्शन प्रशांत गिरकर यांनी केले असून त्यांनी त्याला आधुनिक सादरीकरणाची जोड दिली आहे.या नाटकाचे पुढील प्रयोग १६ एप्रिल रोजी ठाणे येथील काशीनाथ घाणेकर येथे, १७ एप्रिलला बोरिवली आणि दादर येथे होणार आहेत.मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये याचे १० यशस्वी प्रयोग आधीच झाले आहेत. आता मुलांच्या परीक्षेनंतर सुट्ट्यांमध्ये हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रात सादर होणार असून १ ते ३ मे दरम्यान कोकण दौऱ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अभिनेते प्रभाकर मोरे यांनी आपला अनुभव शेअर केला. ते म्हणाले, “प्रमाण भाषेत बोलणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. इतकी वर्षं कोकणी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर हा बदल सोपा नव्हता. त्यामुळे या नाटकासाठी मला अधिक वेळ देऊन मेहनत घ्यावी लागली. पण या प्रक्रियेत खूप काही नवीन शिकायला मिळालं.”‘अबब विठोबा बोलू लागला’ हे बालनाट्य केवळ लहान मुलांसाठी नसून मोठ्यांसाठीही विचार करायला लावणारं आहे. संस्कृती आणि परंपरेची सुंदर सांगड घालणाऱ्या या नाटकातून आजच्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला वास्तवाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडणारं हे नाटक प्रत्येकाने आवर्जून पाहावं, असं आवाहनही प्रभाकर मोरे यांनी यावेळी केलं.

‘कर्टेन रेझर एंटरटेनमेंट’ आणि ‘लिटिल थिएटर’ अर्थात‘बालरंगभूमी’या संस्थेकडून नीळकंठ नांदुरकर लिखित हे विनोदी नाटक नव्या संचासह प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकाचा इतिहासही तितकाच समृद्ध आहे. यापूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे, विनोद हडप यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या नाटकात काम करत त्याला अफाट लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांच्या अभिनयामुळे हे नाटक त्या काळात प्रचंड गाजलं होतं. आता सुधाताईंच्या पश्चात निर्माती नमिता वागळे-गिरकर या नाटकाला नव्या रूपात सादर करत आहेत.

Kantara Controversy : ‘कांतारा’ नक्कल प्रकरणी रणवीर सिंगचा मोठा निर्णय, ‘या’ पवित्र मंदिरात जाऊन मागणार माफी?

या नव्या आवृत्तीत प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे ‘धम्माल पुजारी’च्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत सागर पवार, नीता दोंदे, निखिल केंजळे, प्रकाश अय्याळ, अजित सावरे, प्रेम औटि, आशिक चव्हाण, विरराज राजपूत, उन्नती शिंदे, बालकलाकार अबीर जोशी, गोजिरी जगदाळे, कियारा पाटील, श्रीजा पोटे, आयुष टेंबे, ध्रुव खानविलकर, सिद्धेश बरीदे, ओवी भुजबळ, मृगा जोशी नाटाकाची रंगत वाढवणार आहेत.

या नाटकाविषयी बोलताना दिग्दर्शक प्रशांत गिरकर सांगतात, आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या जाळ्यात अडकलेल्या पिढीला वास्तवाशी पुन्हा जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न म्हणजे ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे नाटक. हे नाटक केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नसून, संस्कार आणि संस्कृती यांचा सुरेख मिलाफ प्रेक्षकांसमोर मांडतं आजच्या धावपळीच्या जीवनात हरवत चाललेल्या मूल्यांची जाणीव करून देत, कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम हे नाटक करतं. विशेष म्हणजे, हे फक्त बालनाट्य नाहीतर मोठ्यांसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. पालकांनी बालकांसोबत बालक होवून पहावे असे नाटक आहे. पालक आणि मुलांमधील नातं अधिक घट्ट करण्यासाठी, संवाद वाढवण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी हे नाटक एक प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास ते व्यक्त करतात.

‘जब वी मेट’ आणि ‘तमाशा’ चित्रपटाचा सिक्वेल येणार? इम्तियाज अलीने तोडलं मौन, भविष्यातील योजनांबद्दल केला खुलासा

नाटकाचे नेपथ्य महेश साळगावकर तर संगीताची जबाबदारी आनंद ओक यांनी सांभाळली आहे. रंगभूषा स्वप्नील चिमणे, प्रकाशयोजना केदार भोंडवे यांची आहे. वेशभूषा काजल अटेलियर यांची आहे. निर्मिती व्यवस्था नरेंद्र आंगणे यांनी सांभाळली आहे.

Web Title: Abab vithoba bolu lagla prabhakar mores childrens play new experiment new language to deliver a special message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
4

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.