
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गायक अनेक महिन्यांपासून आजारी होते
बऱ्याच काळापासून आजाराशी झुंजणारे अभिजित मजुमदार हे भुवनेश्वर येथील एम्समध्ये उपचार घेत होते. चाहते सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करत होते. अनेक महिने उपचार करूनही त्यांना वाचवता आले नाही आणि त्यांचे निधन झाले आहे. या बातमीने त्यांच्या कुटुंबाचे आणि चाहत्यांचे मन दुखावले गेले आहे. मजुमदार ऑक्टोबर २०२५ पासून आजारी होते, त्यानंतर त्यांना कटकमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ବିଶିଷ୍ଟ ସଙ୍ଗୀତ ନିର୍ଦ୍ଦେଶକ ତଥା ଗୀତିକାର ଅଭିଜିତ ମଜୁମଦାରଙ୍କ ଦେହାନ୍ତ ବିଷୟରେ ଜାଣି ମୁଁ ଦୁଃଖିତ। ଓଡ଼ିଆ ସଙ୍ଗୀତ ଜଗତ ପ୍ରତି ତାଙ୍କର ଅବଦାନ ସର୍ବଦା ସ୍ମରଣୀୟ ରହିବ। ଏପରି ଦୁଃଖଦ ସମୟରେ ଶୋକସନ୍ତପ୍ତ ପରିବାର ବର୍ଗଙ୍କ ପ୍ରତି ମୋର ଗଭୀର ସମବେଦନା ଜଣାଇବା ସହ ଦିବଂଗତ ଆତ୍ମାର ସଦଗତି କାମନା କରୁଛି। — Naveen Patnaik (@Naveen_Odisha) January 25, 2026
अभिजित मजुमदार यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु
अभिजित यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नंतर एम्स भुवनेश्वरच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये हलवण्यात आले. संगीतकारांना काही दिवस व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. सप्टेंबरच्या अखेरीस त्यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा दिसून आली, त्यानंतर त्यांना आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले, परंतु ते एम्समध्येच दाखल राहिले. आज, २५ जानेवारी रोजी अभिनेत्याची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
लोकप्रिय LGBTQ इन्फ्लुएन्सरचा धक्कादायक मृत्यू; थायलंडच्या जंगलात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह
माजी मुख्यमंत्री यांनी वाहिली श्रद्धांजली
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी संगीतकारांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, “प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गीतकार अभिजीत मजुमदार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला खूप दुःख झाले आहे. ओडिया संगीत जगतात त्यांचे योगदान नेहमीच लक्षात राहील. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. दिवंगत आत्म्याला शांती मिळो.” असे लिहून त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.