Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना ॲक्शन ना रोमान्स! अभिषेक बच्चन घेऊन येतोय एक इमोशनल चित्रपट, “बी हॅप्पी”चे पहिले पोस्टर आऊट!

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. घूमरमध्ये प्रशिक्षकाची भूमिका साकारल्यानंतर एका वर्षानंतर अभिनेता आता वडिलांची भूमिका साकारून आपल्या मुलीला आधार देताना दिसणार आहे. 'बी हॅप्पी' या आगामी चित्रपटातील अभिषेक बच्चनचा पहिला लुक प्रदर्शित झाला आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 21, 2024 | 05:21 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनला चाहत्यांनी मोठ्या पडद्यावर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिले अभिनय करताना पहिले आहे. अनेक वेगवेगळी पात्र साकारून त्याने आपले अभिनय कौशल्य प्रेक्षकांच्या समोर आणले आहे. पण आता अभिनेता वडिलांच्या भूमिकेत दिसणार असून तो आपल्या मुलीला वाढवताण आणि तिची सगळी स्वप्न एकटा पूर्ण करताना दिसणार आहे. घूमर या चित्रपटापासूनच चाहते अभिषेक बच्चनला चित्रपट आणि मालिकांमध्ये पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक होते. आता त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात तो सिंगल वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिषेक बच्चनच्या नवीन चित्रपटाची घोषणा
अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट बी हॅप्पी ची घोषणा २१ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले असून, या पोस्टरवरील चित्रात अभिषेक बच्चन त्याच्या ऑन-स्क्रीन मुलीसोबत हवेत उडताना दिसत आहे. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्याला इमोशनल टच देणार असल्याचे पोस्टर पाहून स्पष्ट होत आहे. या चित्रपटाची कथा आणि अभिषेकचे नवे पात्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

 

चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होणार चित्रपट
अभिषेक बच्चनचा बी हॅप्पी कधी रिलीज होणार आहे, त्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, हा चित्रपट कुठे प्रदर्शित होणार आहे, याची माहिती मिळाली आहे. हे चित्रपटगृहांऐवजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर स्ट्रीम केले जाणार आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर कमेंट बॉक्समध्ये आपली उत्सुकता व्यक्त करत आहेत. हा चित्रपट चित्रपगृहात दाखल न होता थेट OTT प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा- जागतिक स्टार नोरा फतेही IIFA 2024 च्या स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी सज्ज!

काय आहे बी हॅप्पी चित्रपटाची कथा?
बी हॅप्पी ही एका अविवाहित वडिलांची कथा आहे आणि आपल्या मुलीला भारतातील सर्वात मोठ्या नृत्य रिॲलिटी शोमध्ये परफॉर्म करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करण्याचा त्याचा सुंदर प्रवास या चित्रपटामध्ये दाखवला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या एक दिवस आधी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांनी केले आहे.

Web Title: Abhishek bachchans emotional film be happy first poster out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 05:21 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • OTT platform
  • Remo D'Souza

संबंधित बातम्या

OTT सबस्क्रिप्शनचा नवा नियम होणार लागू? प्लॅन कॅन्सल करणं होणार आणखी कठीण? नेमकं प्रकरण आहे तरी काय?
1

OTT सबस्क्रिप्शनचा नवा नियम होणार लागू? प्लॅन कॅन्सल करणं होणार आणखी कठीण? नेमकं प्रकरण आहे तरी काय?

संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?
2

संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पावसाळ्यात आता थरार, रहस्य आणि डब मराठी चित्रपटांचा मेगा वर्षाव!
3

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पावसाळ्यात आता थरार, रहस्य आणि डब मराठी चित्रपटांचा मेगा वर्षाव!

‘पंचायत ५’ची घोषणा! फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा; वेबसीरिज केव्हा रिलीज होणार ?
4

‘पंचायत ५’ची घोषणा! फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा; वेबसीरिज केव्हा रिलीज होणार ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.