Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Kumar Death: मनोज कुमार यांचे उद्या जुहू येथे होणार अंत्यसंस्कार, काय आहे अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण?

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण काय? हे उघड झाले आहे. अभिनेत्याचे अंतिम संस्कार कधी आणि कुठे केले जातील हे देखील आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 04, 2025 | 12:37 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

चाहत्यांमध्ये ‘भारत पुत्र’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या बातमीने त्याच्या चाहत्यांचे मन दुखावले आहे. मनोज कुमारच्या मृत्यूमागील कारण काय होते हे आता आपण जाणून घेणार आहोत. खरंतर, अभिनेता श्वसनाच्या आजाराने ग्रस्त होता. गेल्या एक महिन्यापासून ते कोकिलाबेन रुग्णालयात दाखल होते. मनोज कुमार यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित माहिती देखील आता समोर आली आहे.

मनोज कुमारने किती संपत्ती सोडली मागे? अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मितीतून केली एवढी कमाई!

मनोज कुमार यांचे अंत्यसंस्कार कधी होणार?
अभिनेता मनोज कुमार यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव आज रुग्णालयातच राहणार आहे. मनोज कुमार यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी दुपारी १२ वाजता विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. असे म्हटले जाते की अभिनेत्याच्या कुटुंबातील काही सदस्य परदेशात आहेत. यामुळे उद्या त्यांचे अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज कुमार यांच्या पत्नी शशी गोस्वामी देखील आजारी असल्याचे समजले आहे.

 

#WATCH | Veteran actor Manoj Kumar passed away at the Kokilaben Dhirubhai Ambani Hospital early this morning at around 3:30 AM. His son, Kunal Goswami, says, “…He has had health-related issues for a long time. It’s the grace of the god that he bid adieu to this world… pic.twitter.com/bTYQnXNHcF — ANI (@ANI) April 4, 2025

मनोज कुमारच्या मुलाने काय म्हटले?
दुसरीकडे, वडील मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल मुलगा कुणाल गोस्वामी यांचे अधिकृत विधानही समोर आले आहे. ANI शी बोलताना अरुण गोस्वामी म्हणाले, ‘माझे वडील मनोज कुमार यांचे आज पहाटे 3.30 वाजता कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते बराच काळ आजारी होते पण त्यांनी मोठ्या धैर्याने सर्व लढाई लढली. आणि आता ते शांतीने या जगातून गेले आहे ही देवाची कृपा आहे. उद्या शनिवारी सकाळी त्यांचे अंतिम संस्कार केले जाणार आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे.

Manoj Kumar: मनोज कुमार यांना ‘या’ गंभीर आजारामुळे गमावावा लागला जीव, रोगाची लक्षणे काय?

मनोज कुमार यांची चित्रपट कारकीर्द
उल्लेखनीय आहे की २४ जुलै १९३७ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेल्या मनोज कुमार यांनी ‘फॅशन’ (१९५७) या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी ८० वर्षांच्या भिकाऱ्याची भूमिका साकारली होती. यानंतर मनोज कुमार यांनी ‘कांच की गुडिया’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’, ‘वो कोण थी’ आणि ‘पत्थर के सनम’ यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे बहुतेक चित्रपट देशभक्तीच्या भावनांशी संबंधित होते. चित्रपटांमधील योगदानासाठी मनोज कुमार यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Actor manoj kumar latest update funeral details prolonged illness kokilaben dhirubhai ambani hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Manoj Kumar Passes Away

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
4

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.