
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
दरम्यान, या चित्रपटातील एका गाण्याने सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हजारो चाहते या गाण्यावर शॉर्ट्स आणि रील्स बनवत आहेत. ‘जब जिद पे आ गई पार्वती’ हे गाणं सध्या चांगलंच चर्चेत आहे. मात्र हे गाणं गाताना अनेकांकडून एका ओळीत चूक होत असल्याचं समोर आलं आहे.
या गाण्यातील एक ओळ अनेकजण चुकीच्या पद्धतीने म्हणताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या ओळीत एक सुंदर बुंदेली शब्द आहे. त्या शब्दाचा नेमका अर्थ माहीत नसल्यामुळे अनेकजण तो चुकीचा उच्चारत आहेत.
गाण्यात सप्तर्षी देवी पार्वतीला समजावण्यासाठी येतात. त्यावेळी ते म्हणतात, “के जिद कर रही, के खुमर रही ऐसे वार के लाने…” ही या ओळीतील योग्य शब्दरचना असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र सोशल मीडियावर आणि अनेक रील्समध्ये हीच ओळ “के जिद कर रही, के को मर रही ऐसे वार के लाने…” अशी ऐकायला मिळते. त्यामुळे अनेकांना या गाण्याच्या बोलांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (Hanuman Ansh Parvati Song)
‘खुमर रही’ हा शब्द या गाण्याच्या अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यातून तीव्र इच्छा, तळमळ, आसक्ती किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी असलेली अस्वस्थता आणि हट्ट असा भाव व्यक्त होतो.
म्हणजेच, एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला मिळवण्यासाठी मनापासून अस्वस्थ होणे, त्यासाठी आग्रही राहणे किंवा एखादी गोष्ट मिळवण्याची तीव्र इच्छा असणे, असा या शब्दाचा भावार्थ घेतला जातो.
‘पार्वती’ गाण्यातील ज्या ओळीबाबत सध्या सोशल मीडियावर संभ्रम आहे, त्या ओळींचे योग्य बोल असे आहेत—
“शंभू, शिव शंभू भोलेनाथ!
जब जिद पे आ गई पार्वती, पार्वती, पार्वती…
समझाने पहुंचे सप्तऋषि, सप्तऋषि, सप्तऋषि…
काय जिद कर रहीं?
काय खुमर रहीं?
काय जिद कर रहीं?
काय खुमर रहीं ऐसे वर के लाने?
जाके सीस पे गंगा और गले में डारे फिर रहे सांप,
जाके सीस पे गंगा और गले में डारे फिर रहे सांप…
इतने सीधे-साधे हैं, सब कहते ‘भोलेनाथ’, भोलेनाथ…”
गाण्याच्या प्रसंगात सप्तर्षी माता पार्वतीला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. भगवान भोलेनाथांना पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतीने केलेल्या तपश्चर्येच्या आणि तिच्या हट्टाच्या संदर्भात हा संवाद आहे.
सप्तर्षी पार्वतीला समजावताना भोलेनाथांच्या साधेपणाचा उल्लेख करतात. त्यांच्या मस्तकावर गंगा आहे, गळ्यात सर्प आहेत आणि त्यांचं जीवन ऐहिक सुख-सुविधांपासून दूर आहे. अशा भोलेनाथांना मिळवण्यासाठी पार्वती इतकी आग्रही आणि अस्वस्थ का झाली आहे, असा भाव या गाण्यातून व्यक्त केला जातो.
त्यामुळे ‘काय को मर रही’ असा शब्दप्रयोग केल्यास गाण्याचा मूळ भाव आणि अर्थ स्पष्ट होत नाही. त्याऐवजी ‘काय खुमर रही’ या शब्दातून पार्वतीची भोलेनाथांना मिळवण्याची तीव्र इच्छा, तळमळ आणि हट्ट अधिक सुंदरपणे व्यक्त होतो.
सोशल मीडियावर सध्या या गाण्याच्या रील्सचा ट्रेंड सुरू असून, अनेकजण आपल्या व्हिडीओमध्ये ही ओळ गात आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी ‘जब जिद पे आ गई पार्वती’ हे गाणं गाताना ‘काय को मर रही’ नव्हे, तर ‘काय खुमर रही’ हे बोल लक्षात ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे.