Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक गेले कित्येक दशक गाजवत आहे आणि आता नव्या रेकॉर्डसाठी सज्ज झालं आहे. आता एकाच दिवस या नाटकाचे सलग ७ प्रयोग पुण्यातील बालगंधर्वमध्ये रंगणार आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 30, 2026 | 12:32 PM
अलबत्या - गलबत्या करणार विश्वविक्रम

अलबत्या - गलबत्या करणार विश्वविक्रम

Follow Us
Follow Us:
  • अलबत्या गलबत्या नाटकाचा होणार विश्वविक्रम 
  • १५ ऑक्टोबरला रंगणार मुलांसाठी खास प्रयोग
  • एका दिवशी सलग ७ प्रयोग 
Natak News: मराठी बालरंगभूमीवर आपल्या अनोख्या जादूने गेली पाच दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अद्वैत थिएटर निर्मित ‘अलबत्या-गलबत्या’ हे लोकप्रिय बालनाट्य आता आणखी एका शिखर विश्वविक्रमाच्या दिशेने झेपावले आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात या नाटकाचे सलग ७ प्रयोग रंगणार असून, या अनोख्या उपक्रमातून पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील हजारो मुलांना आनंदाची अविस्मरणीय सफर घडणार आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सर्वस्य प्रोडक्शन आणि अद्वैत थिएटर यांच्या पुढाकाराने तसेच पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम साकारत आहे. बालरंगभूमीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणाऱ्या या शिखर विश्वविक्रमाकडे सध्या संपूर्ण रंगभूमीचे लक्ष लागले आहे.

हजाराव्या प्रयोगाकडे वाटचाल

अद्वैत थिएटर निर्मित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या-गलबत्या’ या नाटकाची सध्या हजाराव्या प्रयोगाकडे दमदार घोडदौड सुरू आहे. गमती-जमती, हशा, टाळ्या आणि शिट्ट्यांनी नाट्यगृह दणाणून सोडणारे हे बालनाट्य केवळ मुलांचेच नव्हे, तर त्यांच्या पालकांसह ज्येष्ठ आणि थोरामोठ्यांचेही भरभरून मनोरंजन करत आहे. दैनंदिन धावपळीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यातून काही क्षण मुक्त करत प्रेक्षकांना एका आनंदी, जादुई सफरीवर घेऊन जाण्याचे काम हे नाटक सातत्याने करत आहे.

Albattya Galbattya Natak: ‘अलबत्या गलबत्या’ची १००० प्रयोगांकडे झेप; आता बालप्रेक्षकांसाठी खास गाण्यांची मेजवानी

पाच दशकांपूर्वी लिहिले होते नाटक 

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या जादुई लेखणीतून तब्बल पाच दशकांपूर्वी जन्माला आलेल्या ‘अलबत्या-गलबत्या’ची मोहिनी आजही कायम आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, मनोरंजनाची माध्यमे बदलली; मात्र या नाटकाची लोकप्रियता आणि त्यातील जादू आजही तितकीच ताजी आहे.या नाटकाने आतापर्यंत ३६५ दिवसांत ३३३ प्रयोग हाऊसफुल्ल करण्याचा विक्रम नोंदवला आहे. याशिवाय एका दिवसात सलग ४, ५ आणि ६ प्रयोग सादर करण्याचा विक्रमही या नाटकाच्या नावावर आहे. आता सलग ७ प्रयोगांच्या शिखर विश्वविक्रमाची भर पडणार आहे.

विश्वविक्रमाकडे वाटचाल

‘अलबत्या-गलबत्या’च्या लोकप्रियतेत नाटकातील गाण्यांचा मोठा वाटा आहे. रत्नाकर मतकरी, चिन्मय मांडलेकर, समृद्धी पांडे, संचित गायकवाड आणि संस्कारी यांनी शब्दबद्ध केलेली ही गाणी अवधूत गुप्ते, वैशाली सामंत यांच्यासह बालदोस्तांनी आपल्या आवाजाने अधिक श्रवणीय आणि लोकप्रिय केली आहेत.

दरम्यान, ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सोमवार, २८ सप्टेंबर रोजी ‘अलबत्या-गलबत्या’च्या संगीताचे अनावरण मोठ्या दिमाखात पार पडले. विशेष म्हणजे सकाळी ८ वाजताचा प्रयोग असूनही नाट्यगृह हाऊसफुल्ल होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादितचे प्रशासक विद्याधर अनास्कर, उद्यम विकास सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा लीनाताई अनास्कर आणि बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के यांच्या हस्ते संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला.

१५ ऑक्टोबरला ७ सलग प्रयोग 

यावेळी बोलताना विद्याधर अनास्कर यांनी पुण्यात होणाऱ्या शिखर विश्वविक्रमाची घोषणा केली. बालगंधर्व रंगमंदिरात १५ ऑक्टोबर रोजी ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग सादर करून नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.

या उपक्रमामागे केवळ विश्वविक्रमाची नोंद करण्याचा हेतू नसून, पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो मुलांना दर्जेदार नाट्याचा आनंद देत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा मानस आहे. सामूहिक प्रयत्न, हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि रंगभूमीवरील प्रेम यांच्या बळावर साकारला जाणारा हा आगळावेगळा सोहळा निश्चितच मराठी रंगभूमीच्या इतिहासात संस्मरणीय ठरणार आहे.

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Web Title: Albatya galbatya natak ready to set new record 7 prayog in one day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 12:32 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
1

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
3

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
4

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.