Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Nadotsavm 2026: भक्ती संगीताचा खास उत्सव, झी एंटरटेनमेंटच्या नादोत्सवम २०२६ ची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील लोककलेचा हा उत्सव अनुभवता येणार आहे. नवा उत्सवाची खास पर्वणी

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 30, 2026 | 03:14 PM
नादोत्सवम २०२६ ची घोषणा

नादोत्सवम २०२६ ची घोषणा

Follow Us
Follow Us:
  • लोककला, भक्ती-संगीत आणि नव्या पिढीचा भन्नाट मेळा
  • रंगणार नादोत्सवम २०२६ 
  • झी एंटरटेनमेंटचा सोहळा, महाराष्ट्राच्या भक्तीसंगीताचा उत्सव 
Nadotsavm 2026: अभंग, भारूड, पोवाडा, गोंधळ… महाराष्ट्राची ओळख असलेल्या या कला आजही तितक्याच उत्साहाने जपल्या जात आहेत. याच पारंपरिक कलांना आजच्या नव्या पिढीशी जोडण्यासाठी झी एंटरटेनमेंटने ‘नादोत्सवम २०२६’ या सांस्कृतिक आणि भक्ती-संगीत महोत्सवाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील सहा शहरांमध्ये होणाऱ्या या महोत्सवात संगीत, लोककला, कथाकथन आणि स्थानिक कलाकारांचा खास मेळ पाहायला मिळणार आहे.

आजच्या काळात पारंपरिक कलांना नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आणण्याचा ‘नादोत्सवम’चा प्रयत्न आहे. अभंग, भजन, कीर्तन, भारूड, पोवाडा, गोंधळ यांसोबतच वेगवेगळ्या भागांतील लोकसंगीत आणि नृत्यप्रकारही या महोत्सवात पाहायला मिळतील. विशेष म्हणजे, प्रत्येक शहराची खासियत आणि तिथली लोककला यावरही भर दिला जाणार आहे.

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

अभंग रिपोस्टची खास पर्वणी 

या महोत्सवातील खास आकर्षण असणार आहे ‘अभंग रिपोस्ट’. महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेतील लोकप्रिय अभंगांना आजच्या संगीताचा टच आणि नव्या पिढीला आवडेल अशा परफॉर्मन्ससह सादर केले जाणार आहे. त्यामुळे जुन्या अभंगांचा गोडवा आणि आजच्या संगीताची स्टाईल असे भन्नाट कॉम्बिनेशन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

‘नादोत्सवम’च्या प्रत्येक शहरातील कार्यक्रमाला तिथल्या स्थानिक कलेचा खास रंग असणार आहे. ठाण्यात तारपा, पुण्यात जोगवा नृत्य, छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक लोककला, नाशिकमध्ये पारंपरिक लोकसंगीत, कोल्हापूरमध्ये पोवाडा, तर सोलापूरमध्ये भारूड अशा विविध कलाप्रकारांचा या महोत्सवात समावेश असणार आहे. याशिवाय प्रत्येक शहरातील इतर स्थानिक कलाकारही या मंचावर आपली कला सादर करणार आहेत.

प्रसाद जवादे आणि शिवानी सोनारचं सूत्रसंचालन 

झी मराठीवरील लोकप्रिय कलाकार प्रसाद जवादे आणि शिवानी सोनार या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करणार आहेत. ‘सा रे ग म प’मधील नव्या गायक-कलाकारांनाही या मंचावर आपली कला दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पारंपरिक कलाकारांसोबतच नव्या पिढीतील टॅलेंटही या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. झी मराठी, झी २४ तास, मराठी झी५ आणि झी टॉकीज या उपक्रमाशी जोडलेले आहेत.

३१ ऑक्टोबरपासून सुरूवात 

‘नादोत्सवम २०२६’ची सुरुवात ३१ ऑक्टोबर रोजी ठाण्यातून होणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी पुणे, २८ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, ५ डिसेंबर रोजी नाशिक, १२ डिसेंबर रोजी कोल्हापूर आणि १९ डिसेंबर रोजी सोलापूर येथे हा महोत्सव रंगणार आहे.

या उपक्रमाबद्दल झी मराठी, झी टॅाकीज व मराठी झी ५ च्या बिझनेस हेड व चीफ चॅनेल ऑफिसर हेमा व्ही आर म्हणाल्या, “झी मराठी हे महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी केवळ मनोरंजनाचं माध्यम नसून त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. महाराष्ट्रातील स्थानिक कलाकार आणि त्यांच्या टॅलेंटला व्यासपीठ देण्याची परंपरा झी मराठीने कायम जपली आहे. 

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

मोठं व्यासपीठ देण्याचा उद्देश 

‘नादोत्सवम’च्या माध्यमातून हीच नाळ आणखी घट्ट करत आम्ही महाराष्ट्रातील निवडक शहरांमध्ये पोहोचत आहोत. प्रत्येक शहराची स्वतःची ओळख आणि तिथल्या कलाकारांची वेगळी खासियत आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या शहरात, त्यांच्या लोकांसमोर परफॉर्म करण्याची संधी देणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ‘सा रे ग म प’च्या माध्यमातूनही आम्ही महाराष्ट्रातील घराघरातलं आणि स्थानिक टॅलेंट सातत्याने शोधत आलो आहोत आणि त्यांना मोठं व्यासपीठ दिलं आहे. ‘नादोत्सवम’च्या माध्यमातून हेच कलाकार आपल्या शहरात स्टारप्रमाणे परफॉर्म करताना पाहाणं ही एक खास पर्वणी असेल.”

यूथ बिझनेस हेड अलंकार पाठारे म्हणाले, “‘नादोत्सवम’ची कल्पना आजच्या तरुण पिढीचा आपल्या मुळांशी असलेला कनेक्ट आणि त्यांची मॉडर्न म्युझिकची आवड या दोन्ही गोष्टी एकत्र आणण्याच्या विचारातून आली आहे. आजचा तरुण पारंपरिक अभंग आणि आपल्या संस्कृतीकडे नव्या नजरेने पाहतोय आणि त्याच्याशी स्वतःच्या पद्धतीने कनेक्ट होतोय. त्याच वेळी त्याला म्युझिक आणि परफॉर्मन्समध्ये मॉडर्न टच आणि फ्युजनही आवडतं. हीच गोष्ट लक्षात घेऊन ‘नादोत्सवम’ची संकल्पना करण्यात आली आहे. पारंपरिक कलेचा मूळ गोडवा आणि भावना कायम ठेवत ती आजच्या पिढीला एन्जॉय करता येईल अशा पद्धतीने सादर करणं, हा या उपक्रमामागचा मुख्य विचार आहे.”

महाराष्ट्रातील पारंपरिक कला आणि कलाकारांना मोठ्या मंचावर आणतानाच नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी पुन्हा कनेक्ट करण्याचा ‘नादोत्सवम’चा प्रयत्न आहे. सहा शहरांपासून सुरू होणारा हा प्रवास पुढे महाराष्ट्राच्या कला आणि भक्ती-संगीताचा दरवर्षीचा खास उत्सव बनण्याच्या दिशेने एक पाऊल ठरणार आहे.

Web Title: Zee entertainment nadotsavam 2026 lokkala bhakti sangeet announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • zee marathi

संबंधित बातम्या

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
1

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.