
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
टीव्हीची ग्लॅमरस अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. झी टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘कुंडली भाग्य’ मध्ये सृष्टी अरोरा ही भूमिका साकारून घराघरात ओळख मिळवणारी ही अभिनेत्री वादांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरते.कधी तिची धाडसी विधानं चर्चेत येतात, तर कधी सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ लक्ष वेधून घेतात.
अंजुम फकीहचे नाव अलीकडेच दोन मोठ्या वादांमुळे प्रचंड चर्चेत आलं. पहिलं म्हणजे “लेस्बियन” टॅग आणि दुसरा म्हणजे सिगारेट पितानाचा व्हायरल व्हिडिओ.या दोन्ही घटनांनी तिला एका रात्रीतच ‘टीव्हीची कंट्रोव्हर्सी क्वीन’ बनवलं
खरं तर, अंजुम फकीहची तिच्या को-स्टार आणि जवळच्या मैत्रीण श्रद्धा आर्यासोबत खूप घट्ट मैत्री आहे. दोघींना अनेकदा पार्ट्या आणि आउटिंग्समध्ये एकत्र पाहिलं जातं. पण एकदा सोशल मीडियावर दोघींचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.या फोटोमुळे प्रचंड वाद निर्माण झाला सोशल मीडियावर तो फोटो जोरदार चर्चेचा विषय ठरला. इतकंच नाही तर अनेकांनी अंजुमला “लेस्बियन” म्हणत सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली.
हे प्रकरण वाढल्यानंतर अंजुम फकीहने स्वतः स्पष्टीकरण दिलं.तिने सांगितलं की तिला मुलींमध्ये नव्हे, तर मुलांमध्येच रस आहे.अंजुमने हेही स्पष्ट केलं की ती कधी-कधी आपल्या मैत्रिणींना (गर्लफ्रेंड्सना) गालाऐवजी ओठांवर किस करते, पण याचा अर्थ असा नाही की ती लेस्बियन आहे.तिच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर भरपूर चर्चा रंगली आणि ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली.
IND-SRI सामना बघता बघता मृत्यूनं घातला होता घाला! बॉलिवूडचा हा मराठमोळा अभिनेता तुम्हाला माहितीये का?
वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर अंजुम फकीहने ट्रोल्सना दिलं उत्तर तिने स्पष्ट केलं की ,”ती कोणालाही सिगारेट पिण्यास प्रवृत्त करत नाही, ती फक्त तिची वैयक्तिक आवड आणि स्वातंत्र्य आहे.तरीदेखील, अंजुमने ट्रोलर्सना अत्यंत संयमाने पद्धतीने हाताळलं आणि स्पष्टपणे सांगितलं की ती आपलं जीवन आपल्या मर्जीने जगणं पसंत करते.”