(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
1996 चा वर्ल्ड कप सुरू होता… भारत विरुद्ध श्रीलंकेची मॅच सुरू होती. ही मॅच संपूर्ण देश बघत होता… अगदी सर्वसामान्यांपासून ते फिल्म स्टार्स सुद्धा! असाच एक फिल्म स्टार जो ही मॅच बघत होता, त्याला मॅच बघता बघताच हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्याचा मृत्यूही झाला! त्या अभिनेत्याचं नाव ‘शफी इनामदार’
शफी इनामदार कोण होते?
२३ ऑक्टोबर १९४५ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळच्या एका लहानशा गावात शफी इनामदारांचा जन्म झाला. त्यांनी आपली शाळा गावातच पूर्ण केली आणि नंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून सायन्समध्ये पदवी घेतली.लहानपणापासूनच शफी इनामदारांना अभिनयाची खूप आवड होती. ते शाळेतील नाटकांमध्ये कधी सहभागी व्हायचे तर कधी दिग्दर्शनही करायचे. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात गुजराती आणि मराठी रंगभूमीपासून केली आणि तब्बल ३० हून अधिक नाटकं लिहिली आणि दिग्दर्शित केली.
अभिनयासाठी लग्नाचं बंधन तोडलं, बॉलिवूडची ‘ही’ बोल्ड अभिनेत्री 49 वर्षांच्या वयात जगतेय सिंगल लाइफ!
रंगमंचावरील कामामुळे ठरले अधिक प्रतिभाशाली
मूळचे महाराष्ट्रीयन असलेले शफी इनामदार यांनी केवळ अभिनेता म्हणून नाही तर लेखक दिग्दर्शक म्हणून सुद्धा कला जगतावर आपली स्वतःची छाप उमटवली! मूळचे रंगभूमीवरील कलाकार असल्याने त्यांना कला क्षेत्रातील कोणतंही काम कठीण नव्हतं. रंगमंचावर काम करताना त्यांना सामाजिक विषयांची अधिक जाण झाली आणि यामुळे ते एक संवेदनशील अभिनेता म्हणून आणखी प्रभावी ठरले
सिनेमात कारकीर्द:
शफी इनामदार यांनी १९८२ मध्ये गोविंद निहलानी दिग्दर्शित शशी कपूर यांच्या ‘विजेता’ या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि निहलानी यांनी त्यांची प्रतिभा लगेच ओळखली. १९८३ च्या हिट चित्रपट ‘अर्धसत्य’ मध्ये इन्स्पेक्टर हैदर अलीची भूमिका साकारल्याने त्यांना ओळख मिळाली. लवकरच ते केवळ चित्रपटांमध्येच नव्हे तर टेलिव्हिजनवरही एक परिचित चेहरा बनले. दूरदर्शनवरील १९८४ सालच्या ‘ये जो है जिंदगी’ त्यांच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरला, ज्यामुळे ते घराघरात लोकप्रिय झाला.
Marathi Movie: ‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत,चाहत्यांनी दिला अनोखा सन्मान
शफी इनामदार नावारूपाला आले. पण, 1996 साली कोणाच्याही ध्यानी मनी नव्हतं ते घडलं… संपूर्ण देश वर्ल्ड कपमध्ये मग्न असताना शफी यांना मॅच बघता बघता हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अकाली मृत्यू झाला नसता तर, त्यांनी अभिनय क्षेत्रावरील आपला ठसा आणखी ठळक केला आता हे मात्र नक्की!






