(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
रजनीकांत यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ चित्रपटात सुपरस्टार नागार्जुन सायमनच्या भूमिकेत दिसले आहेत. चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी नागार्जुनचे खूप कौतुक होत आहे आणि लोकांना अभिनेत्याचे पात्रही खूप आवडले आहे. आता ‘कुली’ चित्रपटगृहात प्रदर्शित होताच, नागार्जुनने त्याच्या पुढील चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेता आता लवकरच स्वतःचा १०० वा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. तसेच, आता चाहते अभिनेत्याला पुन्हा एकदा नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
या चित्रपटाची तयारी गेल्या ६-७ महिन्यांपासून सुरू
एका मुलाखतीदरम्यान अभिनेता नागार्जुन म्हणाला की, ‘माझा पुढचा चित्रपट ‘किंग १००’ असणार आहे. गेल्या ६-७ महिन्यांपासून या चित्रपटाची तयारी सुरू आहे. तमिळ दिग्दर्शक कार्तिकने मला एक वर्षापूर्वी त्याची पटकथा सांगितली. हा एक उत्तम चित्रपट आहे आणि आम्ही ‘कुली’ नंतर त्याचे शूटिंग सुरू करू. हा एक अॅक्शन-पॅक्ड फॅमिली ड्रामा चित्रपट आहे.’ असे अभिनेत्याने सांगितले आहे. ही आनंदाची बातमी ऐकताच चाहते खुश झाले आहेत.
१०० व्या चित्रपटात नागार्जुनची भूमिका ?
‘कुली’ मध्ये नागार्जुन खलनायकाची भूमिका करताना दिसला. आणि प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन देखील झाले. तर मागील चित्रपट ‘कुबेर’ मध्येही तो सुरुवातीला खलनायकाचा साथीदार दाखवला आहे. तसेच, नंतर त्याचे पात्र सुधारते. आता अभिनेत्याच्या १०० व्या चित्रपटाबद्दल, नागार्जुन म्हणाला की, ‘यावेळी मी चित्रपटात नायक आहे. दुसरीकडे, जर आपण दिग्दर्शक कार्तिकबद्दल बोललो तर, ‘त्याने यापूर्वी अशोक सेल्वन अभिनीत ‘निथम ओरू वनम’ देखील दिग्दर्शित केला आहे.
‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…
‘कुली’ मधील नागार्जुनची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस
नागार्जुनचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट ‘कुली’ आहे, ज्यामध्ये तो रजनीकांत, सौबेन शाहीर, उपेंद्र कुमार, आमिर खान आणि श्रुती हासन यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटात सायमनच्या नकारात्मक भूमिकेत नागार्जुनची शैली आणि स्वॅग प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तसेच, १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तसेच हा चित्रपट बॉक्स ऑफिस भरभरून कमाई देखील करत आहे.