Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२ वर्षांनी अक्षया नाईकचं जबरदस्त कमबॅक! ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत साकारणार अनोखी भूमिका

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील लतिका जहागिरदारच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री अक्षया नाईक आता दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या परतणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 04, 2025 | 04:53 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका २०२० मध्ये सुरू झाली. या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि ही मालिका प्रत्येकाच्या घराघरात पोहचली. आणि तब्बल ९८१ भागांनंतर २०२३ मध्ये ही मालिका संपली. त्या मालिकेतील लतिका ही भूमिका अक्षयासाठी केवळ एक पात्र नव्हतं, तर तिचं आयुष्यच होतं. त्या मालिकेनं तिला प्रसिद्धीच्या झोतात आणलं आणि मालिकेनंतर अक्षयानं थोडी विश्रांती घेतली. त्या काळात तिने अभिनयापासून दूर राहून स्वतःला वेळ दिला, स्वतःच्या आतल्या कलाकाराला समजून घेतलं. स्वतःवर काम केलं आणि आता अभिनेत्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘संत तुकाराम’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, पुण्यातून दणक्यात प्रमोशनला सुरुवात

‘सन मराठी’वरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका सध्या प्रेक्षकांची लाडकी ठरत आहे. सत्याच्या आणि मंजूच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात संकटांची मालिकाच सुरु झाली आहे. निवडणुकीत सत्याचा विजय झाल्यानंतर मुकादमला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. या पार्श्वभूमीवर आता मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. सरकारी वकील म्हणून अभिनेत्री अक्षया नाईक झळकणार आहे. मंजू सत्याचा जामीन मिळवण्यासाठी धडपडत असतानाच सरकारी वकील समोर आल्यानंतर न्यायालयात काय निकाल लागेल, हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. यापूर्वी अभिनेत्री अक्षया नाईकने सोज्वळ भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे पण आता या मालिकेतून अक्षया पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे.

अभिनेत्रीला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रेम देत असताना अक्षयाची एन्ट्रीने चाहत्यांचा मन जिंकलं आहे. अभिनेत्रीला नव्या भूमिकेत पाहून या मालिकेची कथा आणखी मनोरंजक होणार आहे.

‘कौन बनेगा करोडपती’शो ला २५ वर्षे पूर्ण, अमिताभ बच्चन यांनी शेअर केली खास पोस्ट…

नव्या भूमिकेबद्दल अक्षया नाईक म्हणाली, ‘कॉन्स्टेबल मंजू’ या लोकप्रिय मालिकेत मी नवीन भूमिका साकारणार आहे. जवळपास २ वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे या गोष्टीचा प्रचंड आनंद होत आहे. आतापर्यंत मी कधीच खलनायिकेची भूमिका साकारली नव्हती पण आता अक्षया नव्याने प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मालिकेत सरकारी वकिलाची भूमिका साकारणार आहे. माझ्या आईला वकील व्हायचं होतं आणि या मालिकेनिमित्त मी आईच स्वप्न पूर्ण केलं असं वाटतंय. पहिल्यांदाच सातारा मध्ये शूट करत आहे त्यामुळे उत्सुकता खूप वाढली आहे. अक्षया खलनायिकेची भूमिका साकारू शकते हा विश्वास प्रोडक्शन आणि चॅनेलने दाखवला त्या बद्दल त्यांचे मनापासून आभार मानते.”

Web Title: Akshaya naik makes a powerful comeback with constable manju serial news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi serial news

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.