Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ऑल वी इमॅजिन ऍज लाईट’ आणि ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ साठी कनी कुस्रुतीला मिळाला IMDb स्टारमीटर पुरस्कार!

कनी कुस्रुतीला 'ऑल वी इमॅजिन ऍज लाईट', 'गर्ल्स विल बी गर्ल्स' या चित्रपटासाठी जगभरातून IMDb वर विजिट करणा-या 25 कोटींहून अधिक मासिक पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 22, 2025 | 05:31 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मूव्हीज, टिव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगातील सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb ने ‘ऑल वी इमॅजिन ऍज लाईट’ आणि ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ मधील अभिनेत्री कनी कुस्रुतीला IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याचे घोषित केले आहे. IMDb app वर प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीमध्ये सर्वाधिक उत्तम प्रदर्शन करणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणाऱ्या 25 कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजद्वारे हे निर्धारित होते.

‘डंकी’ फेम वरुण कुलकर्णी किडनीच्या गंभीर आजाराने ग्रस्त; उपचारासाठी अभिनेत्याला पैश्याची गरज!

कुस्रुतीने पायल कपाडियाच्या ‘ऑल वी इमॅजिन ऍज लाईट’मध्ये प्रभा या मुंबईत काम करणाऱ्या मल्याळी नर्सची भुमिका केली आहे. या चित्रपटाने ग्रँड प्रिक्स जिंकून 2024 च्या 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये इतिहास रचला आहे. आणि यावेळी 1994 नंतर पहिल्यांदाच एका भारतीय चित्रपटाने मुख्य स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. या चित्रपटाला 82 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्येही दोन नामांकने मिळाली होती. या चित्रपटाच्या अलीकडे झालेल्या स्ट्रीमिंग रिलीजनंतर प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीमध्ये कुस्रुतीने महत्त्वाचे स्थान पटकावले. IMDb च्या ग्राहकांनी ऑल वी इमॅजिन ऍज लाईटला 7.2/10 रेटींग दिले आहे.

कुस्रुतीच्या अन्य उल्लेखनीय कामांमध्ये केरला कॅफे, बिर्यानी, ओके कंप्युटर, आणि गर्ल्स विल बी गर्ल्स यांचा समावेश आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 40 व्या स्वतंत्र स्पिरिट पुरस्कारांमध्ये गर्ल्स विल बी गर्ल्समधील अभिनयासाठी तिला सर्वोत्तम सहाय्यक भुमिकेसाठी नामांकन मिळालेले आहे. तसेच, ऑल वी इमॅजिन ऍज लाईटला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचरसाठी नामांकन मिळाले होते.

Myositis म्हणजे काय? या आजाराला बळी पडली तेलुगू अभिनेत्री; लक्षणे ऐकून चाहते झाले हैराण!

“ब्रेकआउट स्टार” या पुरस्कारासाठी अभिनेत्री कनी कुस्रुतीला म्हणाली की, ‘IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंदाने मी भावुक झाली आहे. मला इतका आत्मविश्वास कधीच नव्हता. त्यामुळे जेव्हा अशी मान्यता मिळते, तेव्हा आपल्याला कळते की, आपण जे करतो ते बरोबर आहे,” कुस्रुती पुढे म्हणाली, “ज्या लोकांनी मला मदत केली, त्या माझ्या प्रेक्षकांना मला सांगावेसे वाटते की, मी सुद्धा तुमच्यासारखी एक प्रेक्षक आहे आणि मला वेगवेगळ्या गोष्टी बघून नेहमी शिकून माझे विचार आणखी पुढे न्यावेसे वाटतात. IMDb वर आपण वेगवेगळे कलाकार, अभिनेते, फिल्म्स याबद्दल खूप काही शिकू शकतो आणि त्यातून आपल्याला खूप गोष्टी कळतात आणि नवीन संकल्पना मिळतात. हे गिफ्ट आपण स्वत:ला देऊ शकत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी बघत राहा, वेगवेगळ्या कलाकारांचे अभिनय बघत राहा- एखाद्या वेळेस आपल्याला आवडले नाही तरीही. त्यातून आपल्याला काही मिळेल.” ते अभिनेत्रीने सांगितले.

Web Title: All we imagine as light actress wins imdbs breakout star starmeter award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
1

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान
2

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी
3

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी

Prahaar Movie Song:  सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित
4

Prahaar Movie Song: सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.