Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होमिओपॅथीवरील पोस्टमुळे अनुष्का शर्मा चर्चेत; सोशल मीडियावर समर्थन आणि टीकेचा सूर

अभिनेत्री Anushka Sharma हिने होमिओपॅथीबाबत केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पोस्टमध्ये तिने Dr. Rajan Sankaran यांच्या मार्गदर्शनाचा तिला फायदा झाल्याचे सांगितले. काही नेटकऱ्यांनी तिच्या मताचे स्वागत करत होमिओपॅथीच्या सकारात्मक अनुभवांचा उल्लेख केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 03, 2026 | 09:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • विरोध करणारे असे दोन्ही गट सक्रिय झाल्याचे दिसून आले.
  • तिच्या पोस्टवर नाराजी व्यक्त करत अशा उपचार पद्धतींचे समर्थन aकरणे योग्य नसल्याचे म्हटले.
  • अनुष्का शर्माची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावरील चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री Anushka Sharma सध्या तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असणाऱ्या अनुष्काने नुकतेच होमिओपॅथी उपचार पद्धतीबाबत आपला सकारात्मक अनुभव शेअर केला. मात्र, या पोस्टनंतर सोशल मीडियावर तिच्या मताचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन्ही गट सक्रिय झाल्याचे दिसून आले.

‘मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी’ वेब सीरिजला हमदर्द लॅबोरेटरीजचे सह-प्रायोजकत्व! 

अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये Dr. Rajan Sankaran आणि Namita Thapar यांच्यासोबतचा फोटो शेअर करत होमिओपॅथीचा तिच्या आयुष्यात महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले. आरोग्याबाबत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आणि सल्ल्यांमुळे तिला सकारात्मक परिणाम जाणवल्याचेही तिने नमूद केले. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागल्या.

काही नेटकऱ्यांनी अनुष्काच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सार्वजनिक व्यक्तींनी आरोग्यविषयक विषयांवर बोलताना अधिक जबाबदारीने वागावे, असे मत व्यक्त करत काहींनी होमिओपॅथीच्या वैज्ञानिक आधारावरही प्रश्न उपस्थित केले. काही युजर्सनी तर तिच्या पोस्टवर नाराजी व्यक्त करत अशा उपचार पद्धतींचे समर्थन करणे योग्य नसल्याचे म्हटले.

दुसरीकडे, अनेकांनी अनुष्काच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. तिने केवळ स्वतःचा वैयक्तिक अनुभव मांडला असून कोणालाही विशिष्ट उपचार पद्धती स्वीकारण्याचा सल्ला दिलेला नाही, असे समर्थकांचे म्हणणे आहे. काहींनी स्वतःच्या अनुभवांचा दाखला देत होमिओपॅथीमुळे त्यांना फायदा झाल्याचा दावा केला. काही होमिओपॅथी तज्ज्ञांनीही अनुष्काच्या मताचे स्वागत करत या उपचार पद्धतीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

या चर्चेत काही चाहत्यांनी निराशाही व्यक्त केली. एका युजरने अनुष्काचा चाहता असल्याचे सांगत तिच्या मताशी असहमती दर्शवली, तर काहींनी सेलिब्रिटींच्या विधानांचा समाजावर परिणाम होत असल्याने अशा विषयांवर बोलताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत मांडले.

‘द पिरॅमिड स्कीम’मधून अल्फिया जाफरीचे दमदार पदार्पण; अरुणाभ कुमार यांना म्हटले सर्वात मोठा आधारस्तंभ

दरम्यान, या संपूर्ण वादामुळे होमिओपॅथी उपचार पद्धतीवर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काही जण याकडे वैयक्तिक अनुभव म्हणून पाहत आहेत, तर काही जण सार्वजनिक प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या विधानाच्या दृष्टीने या विषयाकडे पाहत आहेत. त्यामुळे अनुष्का शर्माची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावरील चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

Web Title: Anushka sharma sparks debate over a post on homeopathy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • Anushka Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !
1

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !

Rohit-Virat: लॉर्ड्सच्या मैदानावर ‘हिटमॅन’ आणि ‘किंग’ कोहलीचा धमाका, एकत्र 400 सामने खेळण्याचा टप्पा गाठणारी पहिलीच भारतीय जोडी
2

Rohit-Virat: लॉर्ड्सच्या मैदानावर ‘हिटमॅन’ आणि ‘किंग’ कोहलीचा धमाका, एकत्र 400 सामने खेळण्याचा टप्पा गाठणारी पहिलीच भारतीय जोडी

IND vs ENG: टीम इंडियासाठी आज ‘करो या मरो’ची लढत! लॉर्ड्सची खेळपट्टी ठरणार गेमचेंजर; जाणून घ्या पिच रिपोर्ट, संभाव्य प्लेइंग 11
3

IND vs ENG: टीम इंडियासाठी आज ‘करो या मरो’ची लढत! लॉर्ड्सची खेळपट्टी ठरणार गेमचेंजर; जाणून घ्या पिच रिपोर्ट, संभाव्य प्लेइंग 11

अबब! हे तर लयं मारतंय! फक्त 133 रन्स अन् Virat kohli मोडणार क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ रेकॉर्ड
4

अबब! हे तर लयं मारतंय! फक्त 133 रन्स अन् Virat kohli मोडणार क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.