
फोटो सौजन्य - Social Media
हा फोटो केवळ प्रमोशनपुरता मर्यादित न राहता चाहत्यांसाठी आठवणींचा खास क्षण ठरत आहे. बालपणातील निरागसतेपासून ते आजच्या विनोद, गोंधळ आणि मैत्रीने भरलेल्या नव्या कथानकापर्यंतचा हा प्रवास प्रेक्षकांना भावताना दिसत आहे. ‘प्रीतम अँड पेड्रो’ मधून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
या खास आठवणीबद्दल बोलताना Arshad Warsi म्हणाले, “वीर अक्षरशः माझ्या डोळ्यांसमोर मोठा झाला आहे. आम्ही पहिल्यांदा ‘मुन्नाभाई’च्या सेटवर एकत्र काम केलं होतं. मी सर्किटची भूमिका करत होतो, तर वीरने माझ्या मुलाची ‘शॉर्टसर्किट’ ही भूमिका साकारली होती. तो तेव्हाही खूप गोड, उत्साही आणि सतत प्रश्न विचारणारा मुलगा होता. त्याचवेळी तो इतका खोडकरही होता की संपूर्ण सेटवर हशा पिकायचा.”
ते पुढे म्हणाले, “आता इतक्या वर्षांनंतर ‘प्रीतम अँड पेड्रो’मध्ये त्याच्यासोबत सहकलाकार म्हणून उभं राहणं खूप भावूक आणि खास वाटतंय. लहानपणापासून ओळख असलेलं मूल आज इतकं गुणी आणि प्रामाणिक अभिनेता बनलेलं पाहणं ही खूप वैयक्तिक आणि आनंदाची भावना आहे. खरंच, हा प्रवास पुन्हा एकदा पूर्ण वर्तुळ पूर्ण झाल्यासारखा वाटतो.”