Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष सुरू असून, ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी संपूर्ण गावात ‘गाव विकणे आहे’ असे फलक लावले आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 29, 2026 | 02:29 PM
Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Follow Us
Follow Us:
  • पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क ‘विक्रीला’
  • पाण्याअभावी ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडल्याचा दावा
  • ‘गावाचे नाव सांगायलाही लाज’ म्हणत ग्रामस्थांचा संताप
 

सोलापूर : दुष्काळाची दाहकता वाढत असताना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. तुळशी गाव गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करत असून, वारंवार मागणी आणि आंदोलने करूनही प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी थेट गावच ‘विक्रीला’ काढले असून, संपूर्ण गावात ‘गाव विकणे आहे’ असे फलक लावण्यात आले आहेत.

हेही वाचा: Crime News: दुर्गापूजा प्रकरणात माजी मंत्र्यांच्या घरावर ईडीची धाड; ५०-६० कोटींच्या व्यवहाराची चौकशी

पाण्यासाठी महिलांची वणवण; शेतीही पडली

तुळशी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून, महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. दुष्काळाचा मोठा फटका शेतीला बसला असून अनेक शेतजमिनी पाण्याअभावी पडून आहेत. जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे गावातील रोजगाराच्या संधींवरही परिणाम झाला असून, तरुणांमध्ये बेरोजगारी वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडल्याचा दावा

गावातील पाणीटंचाईचा सामाजिक परिणामही आता समोर येत आहे. शेतकरी नारायण कुलकर्णी यांनी सांगितले की, त्यांच्याकडे १५ एकर शेती असूनही पाण्याअभावी ती पडून आहे. गावात पाणी नसल्याने हाताला काम मिळत नाही आणि तरुण बेरोजगार होत आहेत. पाणीटंचाईमुळे गावातील ५०० हून अधिक मुलांची लग्ने जुळत नसल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा: Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

‘गावाचे नाव सांगायलाही लाज वाटते’

पाणीप्रश्नाबाबत नाराजी व्यक्त करताना ग्रामस्थ बापू दगडे म्हणाले, “आमच्या गावावर देव इतका का कोपलाय, समजत नाही. आता तर दुसऱ्या गावी जाऊन आपल्या गावाचे नाव सांगायलाही लाज वाटत आहे.” पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी गावकऱ्यांना थेट गाव ‘विक्रीला’ काढण्याची वेळ आल्याने परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट झाले आहे. आता शासन आणि प्रशासन तुळशी गावाच्या पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Tulshi village water scarcity 500 youth marriages delayed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • latest movies
  • Solapur
  • Solapur News
  • Youth

संबंधित बातम्या

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं
1

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं

Indian Singles : कामाचा ताण अन् डिजिटल दुनियेत तरुण एकटे? डिजिटल कनेक्‍शन असूनही भारतातील तरुण त्रस्त; मॅच ग्रुप सर्व्हेचा दावा
2

Indian Singles : कामाचा ताण अन् डिजिटल दुनियेत तरुण एकटे? डिजिटल कनेक्‍शन असूनही भारतातील तरुण त्रस्त; मॅच ग्रुप सर्व्हेचा दावा

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक
3

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
4

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.