(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारतामध्ये पहिल्यांदाच शाहरुख खान आणि आर्यन खानने मेटाच्या सहकार्याने ‘द बॅड्स ऑफ बॉलीवुड: सीक्रेट रील्स’ या अद्वितीय डिजिटल अनुभवाचं अनावरण केलं आहे. या अनुभवात एक भन्नाट ट्विस्ट आहे. ही रील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट्सवर ‘लॉक’ आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलं! ही रील फक्त तेच लोक पाहू शकतात जे दिलेला कोड क्रॅक करू शकतात.
खऱ्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवुड’ शैलीत, आर्यनने लक्ष प्रेक्षकांकडे वळवले आहे. जिथे त्यांच्या सर्वात लॉयल फॅन्सना विनोद, चॅलेंज आणि बक्षीस मिळतंय, आणि त्यामधून त्यांना एक्सक्लूसिव्ह, कधीच न पाहिलेली बिहाइंड-द-सीन्स फुटेज पाहायला मिळते.
हा डिजिटल अनुभव सध्या इंटरनेटवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. फॅन्स उत्साहात कोड शोधत आहेत, क्लूज शेअर करत आहेत आणि अनलॉक झालेल्या रील्सचे स्निपेट्स सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.
‘द बॅड्स ऑफ बॉलीवुड’ हा शो सोशल मीडियावर नव्या क्रेझमध्ये रुपांतरित झाला आहे. चाहत्यांच्या थिअरीज, एडिट्स, मीम्स आणि अनगिनत रील्स यामुळे हे नाव जगभराच्या टाइमलाईनवर झळकत आहे. हा इंटरअॅक्टिव अनुभव या थराराला अजून पुढे नेत आहे आणि आर्यन खानच्या विश्वात डोकावण्याची एक आगळी संधी देत आहे.
ईशा देओल आणि भरत तख्तानी पुन्हा एकत्र? अभिनेत्रीने एक्स पतीच्या वाढदिवशी केली खास पोस्ट, म्हणाली…
आर्यन खानच्या “द बॅड्स ऑफ बॉलीवुड” या वेब सिरीजने १८ सप्टेंबर २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर पदार्पण केले आहे. ही सिरीज सात भागांची असून, प्रत्येक भागाची लांबी सुमारे ५० मिनिटे आहे. आर्यनने या सिरीजचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती केली आहे, तर त्याची आई गौरी खान हिच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने या सिरीजची निर्मिती केली आहे. यामध्ये लक्ष्या, बॉबी देओल, राघव जुयाल, सहेर बंबा, मोना सिंग, अन्या सिंग, मनोज पहवा, मनीष चौधरी, गौतमी कपूर, रजत बेदी आणि इतर कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
ही सिरीज एक बॉलिवूडच्या झगमगाटामागचं गोंधळलेलं आणि वास्तववादी जग दाखवते. यात एक्शन, विनोद, भावना यांचा समतोल असून, बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी धडपडणाऱ्या कलाकारांचे आणि स्वप्नाळू लोकांचे संघर्ष अधोरेखित केले आहेत.