(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दिग्गज अभिनेत्री आणि इंडस्ट्रीची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री एशा देओलचे लग्न 2012 मध्ये भरत तख्तानीसोबत झाले होतं. मात्र, गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये त्यांचा संबंध तुटला आणि ते विभक्त झाले आहे. तरी त्यांच्या लहान मुलींचा ते एकत्र सांभाळ करीत आहेत. गेल्याच आठवड्यात दोघं भेटले होते आणि त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता ईशाने पुन्हा
एक्स पती भरत तख्तानीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास पोस्ट करत प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत.
ईशाने ही पोस्ट केली असून तिने लिहिलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर भरतचा हसरा फोटो शेअर करत लिहिलंय, “माझ्या बाळांच्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… नेहमी आनंदी, निरोगी राहा. देवाचा तुझ्यावर कायम आशीर्वाद राहो.” या पोस्टसह तिनं काही इमोजीही शेअर केले आहेत.
“रातभर झोपलो नाही…”21 वर्षांच्या अशनूरला सलमान खाननं खडसावलं, आई-वडील झाले भावूक
घटस्फोटाच्या वर्षभरानं त्यांच्यातील एकत्र येण्याबद्दल चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आठवड्यापूर्वीच त्यांचा एकत्र फोटो व्हायरल झाला होता, भरतनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सेल्फी फोटो शेअर केला होता. या सेल्फी फोटोत ईशा, तिची बहीण अहाना आणि तिच्या शेजारी त्यांची एक मैत्रीणही दिसली होती. तसंच भरतनं ‘फॅमिली संडे’ अशी कॅप्शन या फोटोला दिली होती.त्यानंतर आता ईशानं भरता फोटो शेअर केल्यामुळे दोघांच्या नात्याबद्दलच्या चर्चा होत आहेत.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री ईशा आणि अभिनेते भरत यांनी २०१२ मध्ये विवाह केला होता. या दोघांनी मिळून अनेक चढ-उतार पाहिले, मात्र २०२४ मध्ये त्यांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना राध्या आणि मिराया अशी दोन मुलं आहेत. गेल्या वर्षी त्यांनी एका निवेदनाद्वारे सांगितलं की,“आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.” या निर्णयामागे कोणतेही वाद नसून, परस्पर सन्मान आणि समजुतीच्या भावनेतून हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.