(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सुप्रसिद्ध दूरदर्शन आणि बंगाली चित्रपट अभिनेते राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचे वयाच्या ४३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. बंगाली चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहते दुःखी झाले आहेत. चाहते आणि नागरिक अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचा मृत्यू एका अपघातात झाला असल्याचे समोर आले आहे.
अनीत पड्डाच्या ‘शक्ती शालिनी’मध्ये दमदार अभिनेत्याची एन्ट्री; चित्रपट नक्कीच होणार सुपरहिट!
पाहण्यात बुडून अभिनेत्याचा मृत्यू
अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचे निधन झाले झाल्याचे समोर आले आहे. राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचे वयाच्या ४३ व्या वर्षी निधन झाले. आनंदबाजार पत्रिकेला दिलेल्या निवेदनात, भास्कर यांनी राहुल यांचा बुडून मृत्यू झाल्याची पुष्टी केली. त्यांनी स्पष्ट केले की, त्यावेळी अभिनेता चित्रीकरण करत नव्हता. बराच वेळ परत न आल्याने तंत्रज्ञ अभिनेत्याला शोधायला गेले. भास्कर यांच्या म्हणण्यानुसार, राहुल दुपारच्या जेवणानंतर पाण्यात गेले होते. त्यांना लवकर परत येऊन आणखी काही दृश्यांचे चित्रीकरण करायचे होते. मात्र, काही वेळाने अभिनेता बुडाल्याचे उघड झाले. ही बातमी ऐकून सेटवरील सर्वांना धक्का बसला आहे. आणि कलाकार मंडळी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
रुग्णालयात नेत असताना अभिनेत्याने सोडला श्वास
आर्टिस्ट्स फोरमचे प्रतिनिधित्व करणारे दिगंता बागची यांनी एका बंगाली वृत्तपत्राला सांगितले की, शूटिंग संपल्यानंतर राहुल पाण्यात उतरला. त्याला पोहता येत नव्हते. एका तंत्रज्ञाने त्याला बुडताना पाहून जवळच्या सेटवरील इतरांना सावध केले. बॅनर्जी यांना वाचवण्यात आले, परंतु रुग्णालयात नेत असताना त्यांना वाचवता आले नाही. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. पूर्व मेदनापूर जिल्ह्यातील पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आतिश बिस्वास यांनी मृत्यूचे कारण बुडणे असल्याचे सांगितले. सविस्तर वैद्यकीय अहवाल अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. हा अभिनेता ‘भोलेबाबा पार करेगा’ या टीव्ही मालिकेसाठी शूटिंग करत होता.






