(फोटो सौजन्य-Social Media)
बॉलिवूडचा लोकप्रिय फ्रँचायझी चित्रपट ‘रेस’चे तीन भाग प्रेक्षकांना खूप आवडले. त्यामुळे निर्मात्यांनी ‘रेस’, ‘रेस 2’ आणि ‘रेस 3’ मधून बंपर कमाई केली आहे. या फ्रेंचाइजी चित्रपटाचा पहिला भाग 2008 साली प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर दुसरा भाग 2013 मध्ये आणि तिसरा भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता बातम्या येत आहेत की निर्मात्यांनी ‘रेस 4’ चित्रपटाच्या चौथ्या भागाला मंजुरी दिली आहे. चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2025 मध्ये सुरू होणार आहे. यासोबतच एक रंजक माहिती समोर आली आहे आणि ती म्हणजे सलमान खानला ‘रेस 4’ चित्रपटातून काढून टाकण्यात आले असून सैफ अली खान या चित्रपटात जोरदार कमबॅक करणार आहे.
हे अपडेट ‘रेस 4’ चित्रपटाबाबत आले आहे.
तसेच, ‘रेस 4’ या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी चाहत्यांच्या समोर आली आहे. वास्तविक, बॉलिवूड हंगामाशी बोलताना चित्रपटाचे लेखक शिराज अहमद म्हणाले की, “रेस 4 चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2025 च्या सुरुवातीला सुरू होणार आहे. स्क्रिप्ट जवळजवळ तयार आहे. कास्टिंगही ठरले आहे. रेस 4 या चित्रपटासाठी रेस 1 आणि रेस 2 च्या कथेतील पात्रांना पुढे नेले जाणार आहे. पहिल्या दोन चित्रपटांमधून आम्ही प्रेक्षकांना पुन्हा त्याच दुनियेत घेऊन जाणार आहोत. सैफ अली खान ‘रेस’ आणि ‘रेस 2’ मध्ये दिसला होता. तर सलमान खान ‘रेस ३’ मध्ये दिसला होता. आता पुन्हा एकदा सैफ अली खान ‘रेस 4’ चित्रपटात दिसणार आहे.” असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. अशाप्रकारे सैफ अली खानने ‘रेस 4’ चित्रपटातून दमदार कमबॅक केले असून सलमान खानला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
हे देखील वाचा- आमिर खानने ‘जाने तू या जाने ना’चा सिक्वेल का नाकारला? कथा ऐकून अभिनेत्याला आला संताप!
सलमान आणि सैफचा आगामी चित्रपट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान सध्या त्याच्या ‘सिकंदर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एआर मुरुगदास दिग्दर्शित सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट 2025 च्या ईदला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच सैफ अली खानचा ‘देवरा’ हा चित्रपट 27 सप्टेंबरला चित्रपगृहात रिलीज होणार आहे. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या ‘देवरा’ चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.