(फोटो सौजन्य-Social Media)
इम्रान खान आणि जेनेलिया डिसूझा स्टारर चित्रपट जाने तू या जाने ना 2008 च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणला जातो. आमिर खान या चित्रपटाचा सहनिर्माता होता आणि तो अब्बास टायरवाला यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर लगेचच दिग्दर्शक अब्बास यांना चित्रपटाच्या सिक्वेलसाठी कथेची कल्पना आली.
जाने तू या जाने ना या चित्रपटात अदिती (जेनेलिया) आणि जय (इम्रान) यांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. दोघांची मैत्रीपासून प्रेमापर्यंतची कथा लोकांना आवडली. चित्रपट हिट झाल्यानंतर अब्बास टायरेवाला सिक्वेलची कथा घेऊन आमिर खानकडे गेले. सिक्वलची कथा अदिती आणि जयच्या विभक्त होण्याबाबत असेल, अशी कल्पना त्यांनी मिस्टर परफेक्शनिस्टला दिली होती. सिक्वेलमध्ये जयचे मेघना (मंजरी फडणीस) सोबत अफेअर असल्याचे दिसून येईल. असे त्यानी अमीर खानला सांगितले.
दिग्दर्शक ‘जाने तू या जाने ना’चा सिक्वेल बनवणार होते
दिग्दर्शकाने सांगितले की, सिक्वेलची कथा ऐकल्यानंतर आमिर खान फारसा खूश नव्हता. तो अब्बासला काय म्हणाला याचा खुलासा खुद्द दिग्दर्शकानेच केला आहे. सायरस ब्रोचाशी बोलताना ते म्हणाले की, “मला हे सांगण्याची परवानगी आहे की नाही हे मला माहीत नाही. मिस्टर आमिर खान काय बोलले पाहिजे आणि काय बोलू नये याबद्दल खूप संवेदनशील आहे, परंतु ‘जाने तू’ चित्रपटानंतर लगेचच मला या चित्रपटाच्या सिक्वेलची कल्पना आली.
हे देखील वाचा- ‘खोसला का घोसला’ फेम परविन दाबास अपघातात जखमी, प्रकृती चिंताजनक अभिनेता ICU मध्ये दाखल!
सिक्वेलच्या कथेवर आमिर खान रागावला होता का?
अब्बास टायरेवाला पुढे म्हणाले, “मी विनोद करतोय की नाही याची मला खात्री नव्हती. मी ते खान साहेबांकडे नेले आणि मी त्यांना सांगितले की चित्रपटाची सुरुवात जय आणि अदिती वेगळ्या राहण्यापासून होते. ते वेगळे झाले आहेत आणि जयचे अफेअर आहे मेघनासोबत. आमिर म्हणाला, ‘मला पर्वा नाही की सिक्वेल कोण बनवतो, पण तू बनवणार नाहीस.’ तो म्हणाला की ही सर्वात मूर्ख गोष्ट आहे.” असे त्यांनी सांगून या चित्रपटाचा सिक्वेल असा तयार करू नको असे सांगितले.