Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharti Sigh Birthday: संघर्षातून ‘कॉमेडी क्वीन’पर्यंतचा भारतीचा प्रवास; आज 80 कोट्यवधींची मालकीण, पाहा तिचं आलिशान कार कलेक्शन

Bharti Singh Birthday: गरीबीतून यशाचं शिखर गाठणाऱ्या भारती सिंगचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या. 80 कोटींपेक्षा अधिक संपत्ती, आलिशान घर, लक्झरी कार कलेक्शन आणि यूट्यूबमधून होणाऱ्या कमाईची माहिती.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 03, 2026 | 02:35 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

भारतातील महिला विनोदी कलाकारांचा उल्लेख झाला की सर्वप्रथम नाव घेतले जाते ते भारती सिंग हिचे. आपल्या भन्नाट विनोदशैलीने आणि अचूक कॉमिक टायमिंगने गेली जवळपास दोन दशके ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आज, ३ जुलै रोजी भारती सिंग आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत असून, तिच्या संघर्षापासून ते यशस्वी कारकिर्दीपर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

लहान वयातच वडिलांचा आधार गमावला

३ जुलै १९८४ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भारती सिंगने लहानपणीच कठीण परिस्थितीचा सामना केला. ती अवघी दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवर आली. आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की, कधी कधी कुटुंबाला दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता. एका मुलाखतीत भारतीने सांगितले होते की, काही दिवस त्यांनी मीठ आणि भाकरीवरही दिवस काढले.

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून मिळाली ओळख

२००८ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमधून भारतीने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. ती विजेती ठरली नसली तरी उपविजेती बनत तिने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर ‘कॉमेडी सर्कस’, ‘द कपिल शर्मा शो’, ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ आणि ‘कॉमेडी क्लासेस’ यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमुळे तिला ‘कॉमेडी क्वीन’ म्हणून ओळख मिळाली.

Bharti Singh ने रिव्हील केलं दुसऱ्या मुलाचं नाव, पती आणि गोला सोबत शेअर …

यशस्वी सूत्रसंचालिका म्हणूनही कमावले नाव

कॉमेडीसोबतच भारतीने सूत्रसंचालन क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, ‘हुनरबाज’, ‘खतरा खतरा खतरा’ यांसह अनेक रिअॅलिटी शो आणि पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचालन तिने केले आहे. आजही अनेक निर्माते आपल्या कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी सर्वप्रथम भारतीची निवड करतात.

80 कोटींपेक्षा अधिक संपत्तीची मालकीण

एकेकाळी आर्थिक अडचणींशी झुंज देणारी भारती आज कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती ८० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मुंबईतील आलिशान घरासोबतच तिच्याकडे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूसारख्या लक्झरी कार्सचे कलेक्शनही आहे.

Dipika Kakar : कॅन्सर, वडिलांचं आजारपण अन् घरातील संकटं; दीपिका-शोएबचा 2 वर्षांचा मुलगा एकटेपणाशी झुंजतोय

यूट्यूबमधूनही होते मोठे उत्पन्न

टीव्हीसोबतच भारतीने डिजिटल प्लॅटफॉर्मवरही स्वतःची मजबूत ओळख निर्माण केली आहे. ती पती हर्ष लिंबाचियासोबत ‘Life of Limbachiyaas’ हे लोकप्रिय यूट्यूब चॅनल चालवते. एका मुलाखतीत भारतीने सांगितले होते की, तिच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे ४० टक्के उत्पन्न हे यूट्यूब आणि इतर डिजिटल माध्यमांतून मिळते.

संघर्षातून यशाचं शिखर गाठणारी भारती सिंग आज लाखो चाहत्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरली आहे.

Web Title: Bharti singh birthday from struggles to the comedy queen now owner of 80 crore take a look at her luxurious car collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Birthday
  • Entertainemnt News
  • Television Actress

संबंधित बातम्या

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी
1

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
2

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
4

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.