Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्या बालनचा ‘अमी जे तोमार’ 17 वर्षांनंतर माधुरी दीक्षितसोबत होणार रिक्रिएट, नृत्यात पाहायला मिळणार टक्कर!

कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामधील धमाकेदार गाणं ''अमी जे तोमार ३.० '' नुकतेच रिलीज झाले असून चाहत्यांचा या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 25, 2024 | 05:10 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये माधुरी दीक्षित, विद्या बालन आणि नित्या मेनन यांसारख्या स्टार्सची झलक पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाचा टायटल ट्रॅक जागतिक स्तरावर हिट झाला आहे, संपूर्ण देश या गाण्याच्या तालावर थिरकतो आहे. काही तासांपूर्वीच ‘जाना समझो ना’ या चित्रपटामधील दुसरे गाणेही रिलीज झाले आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आगामी चित्रपट “भूल भुलैया 3” मधील बहुप्रतिक्षित गाणे “अमी जे तोमार 3.0” अखेर 17 वर्षांनंतर चाहत्यांच्या भेटीस आले आहे. याआधी हिट राहिलेले आणि लोकांशी जोडले गेलेले हे आयकॉनिक गाणे एका अप्रतिम ट्विस्टसह पुन्हा कल्पित करण्यात आले आहे, ज्यामध्ये विद्या बालन आणि दिग्गज माधुरी दीक्षित यांचा समावेश आहे. मूळ आवृत्तीतील विद्या बालनच्या नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आणि या पुनरुज्जीवनात तिचे पुनरागमन तितकेच मंत्रमुग्ध करणारे हे गाणं असणार आहे. या गाण्यामध्ये या दोन्ही उत्कृष्ट अभिनेत्याची नृत्याची झलक पाहायला मिळणार आहे. चाहत्यांनी हे गाणं रिलीज होताच डोक्यावर घेतले आहे.

या गाण्यामध्ये विद्या आणि माधुरी एकत्र येऊन एक शाही परफॉर्मन्स सादर करत आहेत, जे दोन शास्त्रीय नृत्य प्रकारांचे अनोखे मिश्रण आहे, जे प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक चिन्नी प्रकाश यांनी कोरिओग्राफ केलेले कथ्थक आणि भरतनाट्यमचे त्यांचे सुंदर एकत्रित सादरीकरण दृश्य चमत्कार ठरणार आहे. हा चमत्कार पाहण्यासाठी चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे देखील वाचा – ‘लाईफ म्हणजे गोंधळ नुसता’; तारूण्यातल्या भावविश्वाची झलक दाखविणारं ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटातील गाणं रिलीज!

‘अमी जे तोमार ३.०’ हे केवळ गाणे नाही तर हे भारतीय शास्त्रीय नृत्याचा उत्सव आहे आणि या प्राचीन कला प्रकारांच्या कालातीत सौंदर्याचा पुरावा आहे. या दोन पॉवरहाऊस कलाकारांच्या सहकार्याने एक अविस्मरणीय सिनेमा क्षण निर्माण केला आहे. ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये धमाका करायला येणार आहे. ‘भूल भुलैया 3’च्या तिसऱ्या भागात कार्तिक आर्यन पुन्हा एकदा ‘रूह बाबा’च्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत तृप्ती डिमरी अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. अनीस बज्मीचा हा चित्रपट दिवाळीत अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’शी टक्कर देणार आहे.

Web Title: Bhool bhulaiyaa 3 new song ami je tomar 3 0 madhuri dixit vidya balan face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 05:10 PM

Topics:  

  • bhool bhulaiyaa 3
  • madhuri dixit
  • Vidya Balan

संबंधित बातम्या

डीपनेक गाऊनमध्ये विद्याचा जलवा, 46 व्या वर्षी 26 वर्षाचे विद्या बालनचे तारूण्य; अदांनी केला चाहत्यांच्या हृदयावर वार
1

डीपनेक गाऊनमध्ये विद्याचा जलवा, 46 व्या वर्षी 26 वर्षाचे विद्या बालनचे तारूण्य; अदांनी केला चाहत्यांच्या हृदयावर वार

जान्हवी कपूरच्या एका कृतीमुळे उडाला गोंधळ, माधुरी दीक्षित-श्रीदेवीच्या व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष!
2

जान्हवी कपूरच्या एका कृतीमुळे उडाला गोंधळ, माधुरी दीक्षित-श्रीदेवीच्या व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष!

Kartik Aaryan च्या आनंदाला नाही उरला पारावार, खास क्षणांचे फोटो शेअर करत म्हणाला…
3

Kartik Aaryan च्या आनंदाला नाही उरला पारावार, खास क्षणांचे फोटो शेअर करत म्हणाला…

Madhuri Dixit Birthday: सलमान- शाहरुख नाही तर, ‘या’ कलाकारांसोबत  माधुरीने दिले सर्वाधिक हिट चित्रपट!
4

Madhuri Dixit Birthday: सलमान- शाहरुख नाही तर, ‘या’ कलाकारांसोबत माधुरीने दिले सर्वाधिक हिट चित्रपट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.