Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kon Honaar Crorepati: ‘हम आपके है कौन’च्या आठवणींना उजाळा; माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांची रंगणार मैफल

Kon Honaar Crorepati : ‘कोण होणार करोडपती’मध्ये माधुरी दीक्षितसोबत रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे दिसणार आहेत. ‘हम आपके है कौन’च्या आठवणींना उजाळा देणारा प्रोमो चर्चेत.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 18, 2026 | 01:33 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Kon Honaar Crorepati:  मराठी रिअॅलिटी शो ‘कोण होणार करोडपती’ सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित या शोचं सूत्रसंचालन करत असून, आतापर्यंत अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाली बेंद्रे, यामी गौतम आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी या शोमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी माधुरीने त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. आता या मंचावर आणखी दोन लोकप्रिय अभिनेत्रींची एन्ट्री होणार आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे ‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होणार असून, त्यांचा प्रोमो सध्या लक्ष वेधून घेत आहे.

माधुरी दीक्षितसोबत रंगणार जुन्या आठवणींचा सिलसिला

सोनी मराठीने नुकताच ‘कोण होणार करोडपती’चा एक खास प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांची शोमध्ये एन्ट्री होताना दिसते. माधुरी दीक्षित दोघींचं स्वागत करते. त्यानंतर तिघींची भेट होते आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. विशेष म्हणजे, ‘हम आपके है कौन’ या गाजलेल्या चित्रपटातील माधुरीच्या अंदाजाची नक्कल करताना रेणुका आणि प्रिया दिसतात. त्यामुळे या भागात धमाल पाहायला मिळणार असल्याची झलक प्रोमोमधून मिळते.

‘रेणुका एकदा हसायला लागली की…’

प्रोमोमध्ये माधुरी दीक्षित रेणुका शहाणे यांच्या स्वभावाबद्दल एक मजेशीर किस्सा सांगताना दिसते. माधुरी म्हणते, “रेणुका एकदा हसायला लागली की मग काय बघायला नको. तिला थांबवणं खूप कठीण आहे.” माधुरीच्या या वक्तव्याला प्रिया बेर्डेही सहमती दर्शवताना दिसतात. तिघींमधील ही मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे या भागात जुन्या आठवणींसोबतच हास्याचे फवारेही उडणार आहेत.

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा

‘हम आपके है कौन’च्या आठवणींना उजाळा

माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांनी १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके है कौन’ या लोकप्रिय हिंदी चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता अनेक वर्षांनंतर या तिन्ही अभिनेत्री एकाच मंचावर एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

‘कोण होणार करोडपती’च्या या खास भागात तिघी कोणते मजेशीर किस्से सांगणार, चित्रपटाच्या सेटवरील कोणत्या आठवणी उलगडणार आणि त्यांच्या गप्पांमधून कोणते नवे खुलासे होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Sidhu moose Wala: सिद्धू मूसेवालाच्या अडीच वर्षांच्या भावाला कोणापासून धोका? तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Web Title: Kon honar crorepati madhuri dixit renuka shahane priya berde ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • entertainment
  • madhuri dixit
  • Reality Show

संबंधित बातम्या

Nayi Naveli Box Office Collection: यामी गौतमच्या ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी वाढ
1

Nayi Naveli Box Office Collection: यामी गौतमच्या ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी वाढ

Belraj Kalarickal: मनोरंजनविश्वावर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकलचं निधन, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
2

Belraj Kalarickal: मनोरंजनविश्वावर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकलचं निधन, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा
3

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा

Sidhu moose Wala: सिद्धू मूसेवालाच्या अडीच वर्षांच्या भावाला कोणापासून धोका? तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?
4

Sidhu moose Wala: सिद्धू मूसेवालाच्या अडीच वर्षांच्या भावाला कोणापासून धोका? तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.