Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भूत बंगला’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; अक्षय कुमार आणि प्रियदर्शनच्या जोडीचा कॉमेडी-हॉरर धमाका

अक्षय कुमार आणि प्रियदर्शन ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकण्याची सज्ज झाली आहे. अखेर ‘भूत बंगला’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यामध्ये सर्व कलाकारांची झलक पाहायला मिळाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 06, 2026 | 02:35 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘Bhooth Bangla’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
  • अक्षय कुमार आणि प्रियदर्शनच्या जोडीचा धमाका
  • ‘Bhooth Bangla’ची संपूर्ण स्टारकास्ट
 

गाजलेली गाणी, लक्षवेधी पोस्टर्स आणि उत्सुकता वाढवणारा टीझर यानंतर अखेर ‘भूत बंगला’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर म्हणजे जणू जुन्या आठवणींनी भरलेला एक मनोरंजक प्रवास आहे, ज्यात विनोद, रहस्य आणि हलकीशी भीती यांची जबरदस्त झलक पाहायला मिळाली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा हा ट्रेलर प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच कथेबद्दल उत्सुकता वाढवतो. अखेर हा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

धक्कादायक! लग्नाच्या वाढदिवसाआधीच टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या; मृत्यूपूर्वी पतीसोबत झालं मोठं भांडण

या ट्रेलरमधून स्पष्ट होतं की, हा चित्रपट केवळ हॉरर नाही, तर कॉमेडी आणि थ्रिलचा उत्तम संगम आहे. बऱ्याच काळानंतर असा प्रभावी आणि पूर्णपणे एंटरटेनिंग ट्रेलर पाहायला मिळाला असून, प्रेक्षकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटातून अक्षय कुमार त्यांच्या जुन्या, विनोदी आणि एनर्जेटिक अंदाजात परतताना दिसत आहेत. त्यांच्या सोबत परेश रावल आणि राजपाल यादव यांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय असरानी यांच्या विनोदी शैलीने ट्रेलरला आणखी रंगत आली आहे.

 

प्रियदर्शन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे, जे त्यांच्या खास कॉमिक टायमिंग आणि भन्नाट कथानकांसाठी ओळखले जातात. ट्रेलर पाहताना हे जाणवतं की, विनोद आणि रहस्याचा समतोल साधणं हे त्यांच्या हातातलं कौशल्य आहे. त्यामुळेच ‘भूत बंगला’ हा केवळ एक चित्रपट नसून, प्रेक्षकांसाठी एक संपूर्ण मनोरंजनाचा पॅकेज ठरणार आहे. तब्बल १४ वर्षांनंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शन ही हिट जोडी पुन्हा एकत्र येत असल्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यांनी यापूर्वी दिलेल्या सुपरहिट कॉमेडी चित्रपटांची आठवण या ट्रेलरमधून दिसून येत आहे.

‘मला भीती होती…’ दीपज्योती मध्ये पूर्वा कौशिक चा नवा अवतार, मालिकेतील भूमिकेबद्दल अभिनेत्रीने केला खुलासा

या चित्रपटात वामिका गब्बी, तब्बू, जिशू सेनगुप्ता आणि मिथिला पालकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. बालाजी मोशन पिक्चर्स आणि केप ऑफ गुड फिल्म्सच्या सहकार्याने हा चित्रपट सादर केला जात आहे. विशेष म्हणजे, ‘भूत बंगला’चे ॲडव्हान्स सशुल्क विशेष प्रेक्षण १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजल्यापासून चित्रपटगृहांमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना चित्रपटाचा अनुभव आधीच घेण्याची संधी मिळणार आहे. एकंदरीत, ‘भूत बंगला’ हा २०२६ मधील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक ठरत असून, त्याचा ट्रेलर पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल उडवणार, यात शंका नाही.

Web Title: Bhoot bangla trailer release time today here s when trailer of bhoot bangla will be unveiled akshay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा
1

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू
2

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य
3

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’
4

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.