Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

 Inshallah Movie: संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांचा रखडलेला ‘इन्शाल्लाह’ चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. सात वर्षांनंतर या प्रोजेक्टवर पुन्हा काम सुरू होण्याची शक्यता असून कथानकात बदल होणार असल्याचं वृत्त आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 05, 2026 | 04:13 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

 Inshallah Movie: आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘गंगुबाई काठियावाडी’नंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहे. या चित्रपटात आलिया भट्टसोबत रणबीर कपूर आणि विकी कौशल हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या त्रिकुटाला पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

दरम्यान, संजय लीला भन्साळी यांचा अनेक वर्षांपासून रखडलेला ‘इन्शाल्लाह’ चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. सात वर्षांपासून रखडलेल्या या प्रोजेक्टबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट पुन्हा एकदा या चित्रपटावर काम करण्याचा विचार करत असल्याचं वृत्त आहे. Inshallah Movie

‘इन्शाल्लाह’वर पुन्हा काम करण्याची तयारी?

‘मिड-डे’च्या वृत्तानुसार, आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांनी ‘इन्शाल्लाह’ या रखडलेल्या चित्रपटावर पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास सात वर्षांपूर्वी या चित्रपटावर काम सुरू करण्यात आलं होतं. मात्र, काही कारणांमुळे हा प्रोजेक्ट पुढे जाऊ शकला नाही.

आता इतक्या वर्षांनंतर या चित्रपटाला पुन्हा सुरुवात करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे. मात्र, यावेळी चित्रपटाच्या कथानकात काही महत्त्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे.

बदलणार चित्रपटाचं कथानक?

वृत्तानुसार, ‘ Inshallah’ची मूळ कथा रोमँटिक ड्रामावर आधारित होती. मात्र, आता संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट चित्रपटाच्या कथेत काही बदल करण्याबाबत चर्चा करत असल्याचं समोर आलं आहे.

या नव्या आवृत्तीत कथा नेमकी कशी असेल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर आलिया भट्टसोबत या चित्रपटात कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत असेल, हेही स्पष्ट झालेलं नाही.

सलमान खानसोबत होणार होता चित्रपट

संजय लीला भन्साळी यांनी २०१९ मध्ये ‘इन्शाल्लाह’ बनवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी या चित्रपटात आलिया भट्टसोबत सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

मात्र, सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील मतभेदांमुळे हा चित्रपट रखडला आणि अखेर त्यावरचं काम थांबलं. त्यानंतर भन्साळींनी आलिया भट्टसोबत ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट केला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

आलिया-भन्साळींचा होणार तिसरा चित्रपट?

जर ‘इन्शाल्लाह’ नव्या स्वरूपात पुन्हा सुरू झाला, तर आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांचा हा एकत्रित तिसरा चित्रपट ठरू शकतो. याआधी दोघांनी ‘गंगुबाई काठियावाडी’मध्ये एकत्र काम केलं आहे आणि आता ‘लव्ह अँड वॉर’मध्येही ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे.

मात्र, ‘इन्शाल्लाह’बाबत आलिया भट्ट किंवा संजय लीला भन्साळी यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात पुन्हा सुरू होणार का आणि त्यात कोण कलाकार दिसणार, याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’

Web Title: Inshallah movie alia bhatt sanjay leela bhansali ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • bollywood movies
  • entertainment

संबंधित बातम्या

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू
1

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य
2

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’
3

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’

Shreya Chaudhary: आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार श्रेया चौधरी; ‘मुपापा’ची रिलीज डेट जाहीर
4

Shreya Chaudhary: आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार श्रेया चौधरी; ‘मुपापा’ची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.