Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’

Sanjay Dutt Statement: ‘भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही’ या वक्तव्यावर संजय दत्तने स्पष्टीकरण दिलं आहे. आपलं वक्तव्य स्क्रिप्टेड होतं आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असं त्याने स्पष्ट केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 05, 2026 | 02:26 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sanjay Dutt Statement: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ‘शेखर टुनाइट’ या कार्यक्रमात संजय दत्तने “मला आता भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही” असं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आणि त्यावरून वादही निर्माण झाला. आता संजय दत्तने या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

‘कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता’

संजय दत्तने सोशल मीडिया अकाउंटवर एक निवेदन शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमात त्याने जे काही बोललं ते पूर्वनियोजित आणि स्क्रिप्टचा भाग होतं, असं त्याने सांगितलं. कोणत्याही व्यक्ती, समुदाय किंवा संस्थेच्या भावना दुखावण्याचा, त्यांचा अपमान करण्याचा किंवा अनादर करण्याचा आपला हेतू नव्हता, असंही त्याने स्पष्ट केलं.

संजय दत्तने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, त्या संभाषणाचा उद्देश केवळ हलकंफुलकं आणि विनोदी वातावरण निर्माण करणं हा होता. आपल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ लावला गेला आणि आपले शब्द संदर्भाबाहेर घेतले गेले, असं त्याने म्हटलं आहे.

‘मुन्नाभाई’च्या ‘गांधीगिरी’ची होती झलक

संजय दत्तने पुढे सांगितलं की, त्याच्या वक्तव्यामागची भावना ‘मुन्नाभाई’सारख्या चित्रपटांमधील विनोद आणि उपहासाच्या शैलीशी संबंधित होती. विशेषतः ‘गांधीगिरी’च्या संकल्पनेतून प्रेम, आपलेपणा, एकता आणि सदिच्छा यांचा संदेश देण्याचा उद्देश असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

कार्यक्रमात संजय दत्तला देशाचा पंतप्रधान असल्याची कल्पना करून काही मिनिटं लोकांना संबोधित करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने ‘मुन्नाभाई’च्या शैलीत उपहासात्मक भाषण केलं.

Bhootam Bhayam Movie: ‘भूतम भय्यम’च्या कलाकारांमध्ये असं तयार झालं बॉन्डिंग; दिग्दर्शकांनी सांगितला २५ दिवसांच्या वर्कशॉपचा किस्सा

‘मला माझ्या देशात तीच शांतता जाणवत नाही’

या भाषणादरम्यान संजय दत्तने भारतातील प्रेम, शांतता आणि पाहुणचाराचा उल्लेख केला होता. “मला आता माझ्या देशात तीच शांतता जाणवत नाही,” असं तो म्हणाला होता. तसेच पूर्वीचे दिवस पुन्हा यावेत, अशी प्रार्थना करत असल्याचंही त्याने म्हटलं होतं.

मात्र, या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेतला गेल्याचं संजय दत्तने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

मराठीत बोलण्यावरूनही झाला होता वाद

दरम्यान, संजय दत्तच्या आणखी एका वक्तव्याचीही अलीकडे चर्चा झाली होती. एका कार्यक्रमात त्याला मराठीत बोलण्यास सांगण्यात आलं होतं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही त्याला मराठीत बोलण्याचा आग्रह केला.

त्यावर संजय दत्तने आपण येरवडा तुरुंगात सहा वर्षं घालवली, तरीही मराठी शिकलो नाही, असं मिश्कीलपणे म्हटलं होतं. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी त्याच्या उत्तराचं कौतुक केलं, तर काहींनी त्यावर टीका केली.

आता ‘भारतात शांतता नाही’ या वक्तव्यावर संजय दत्तने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Mohsin Khan Marries Tamanna: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; लग्नाचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

Web Title: Sanjay dutt statement india peace scripted clarification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • entertainment
  • Sanjay Dutt

संबंधित बातम्या

Shreya Chaudhary: आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार श्रेया चौधरी; ‘मुपापा’ची रिलीज डेट जाहीर
1

Shreya Chaudhary: आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार श्रेया चौधरी; ‘मुपापा’ची रिलीज डेट जाहीर

Bhootam Bhayam Movie: ‘भूतम भय्यम’च्या कलाकारांमध्ये असं तयार झालं बॉन्डिंग; दिग्दर्शकांनी सांगितला २५ दिवसांच्या वर्कशॉपचा किस्सा
2

Bhootam Bhayam Movie: ‘भूतम भय्यम’च्या कलाकारांमध्ये असं तयार झालं बॉन्डिंग; दिग्दर्शकांनी सांगितला २५ दिवसांच्या वर्कशॉपचा किस्सा

Mohsin Khan Marries Tamanna: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; लग्नाचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज
3

Mohsin Khan Marries Tamanna: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; लग्नाचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

Miranda Warning movie: जान्हवी किल्लेकरचा ‘मिरांडा वॉर्निंग’मधील लूक पाहिलात का? एका नजरेने वाढवलं रहस्य, नेमकी भूमिका काय?
4

Miranda Warning movie: जान्हवी किल्लेकरचा ‘मिरांडा वॉर्निंग’मधील लूक पाहिलात का? एका नजरेने वाढवलं रहस्य, नेमकी भूमिका काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.