Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू

Talat Aziz House Fire: गझल गायक तलत अजीज यांच्या जुहू येथील घराला भीषण आग लागली. धुरामुळे तलत अजीज यांच्यासह पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पत्नीची बाथरूमच्या खिडकीतून सुटका करण्यात आली.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 05, 2026 | 03:43 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Talat Aziz House Fire: बॉलिवूडचे दिग्गज गझल गायक तलत अजीज यांच्या मुंबईतील जुहू येथील निवासस्थानी शुक्रवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर संपूर्ण डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे तलत अजीज यांच्यासह कुटुंबातील पाच जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

तलत अजीज यांच्यासह पाच जण रुग्णालयात

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर तलत अजीज यांच्या पत्नी बिना, मुलगे शयन आणि अदनान तसेच सिकंदर सिंग यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाचही जणांवर भारतीय आरोग्य निधी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर शनिवारी सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला. तलत अजीज गेल्या चार दशकांपासून आपल्या कुटुंबासह याच इमारतीत राहत असल्याचं सांगितलं जातं.

रात्री उशिरा लागली आग

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे १०:५६ वाजता पाच मजली इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाली. प्राथमिक माहितीनुसार, आग तळमजल्यावरील इलेक्ट्रिकल वायरिंग आणि इन्स्टॉलेशनपर्यंत पसरली होती. घरातील एका सोफ्याला आणि स्प्लिट एअर कंडिशनरलाही आग लागली.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. रात्री ११:५८ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

‘काही मिनिटांतच घर काळ्या धुराने भरलं’

तलत अजीज यांनी या घटनेचा थरारक अनुभव सांगितला. आग लागली त्यावेळी ते खाली टीव्ही पाहत होते, तर त्यांची पत्नी बिना वरच्या मजल्यावर होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, हॉलमधील एअर कंडिशनरमधून अचानक ठिणगी उडाली आणि त्यानंतर आग लागली.

काही मिनिटांतच आग वेगाने पडद्यांपर्यंत पोहोचली आणि संपूर्ण घर दाट, काळ्या धुराने भरून गेलं. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की त्यांना समोरचं काहीही दिसत नव्हतं. अशा परिस्थितीत तलत अजीज आपल्या पत्नीला सतत हाका मारून तिची विचारपूस करत होते.

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’

बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची सुटका

आग आणि धुरामुळे घरात राहणं कठीण झाल्यानंतर बिना वरच्या मजल्यावरील बाथरूममध्ये गेल्या. त्यांनी तिथून खिडकीतून मदतीसाठी हाक मारली. त्यानंतर एका शेजाऱ्याने शिडीच्या मदतीने खिडकीपर्यंत पोहोचून त्यांची सुखरूप सुटका केली.

तलत अजीज यांनी सांगितलं की, या संपूर्ण घटनेदरम्यान त्यांच्या कुटुंबासाठी परिस्थिती अत्यंत भयावह होती. आग आणि धुरामुळे घरात राहणं अशक्य झालं होतं.

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’

उपचारानंतर सर्वांना डिस्चार्ज

आगीच्या धुरामुळे पाचही जणांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर शनिवारी सर्वांना घरी सोडण्यात आलं. घर पुन्हा राहण्यायोग्य होईपर्यंत तलत अजीज आणि त्यांचं कुटुंब हॉटेलमध्ये राहण्याची शक्यता आहे.

आगीमुळे घरातील अनेक वस्तूंचे नुकसान झाले. तलत अझीझ म्हणाले की, त्यांचे काही हार्मोनियम आणि पत्नी बिनाची अनेक चित्रेही आगीत नष्ट झाली. कुटुंबाने या वस्तू अनेक वर्षांपासून जपून ठेवल्या होत्या, त्यामुळे हे नुकसान त्यांच्यासाठी भावनिकही आहे. या वस्तूंचे नुकसान दुःखद असले तरी, कुटुंब सुरक्षित आहे ही सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे, असे तलत अझीझ म्हणाले. त्यांनी वेळेवर पोहोचून मदत केल्याबद्दल पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका पथकाचे आभार मानले. त्यांनी मदतीसाठी शेजाऱ्यांचीही प्रशंसा केली.

Web Title: Talat aziz house fire wife rescue five hospitalised

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • entertainment
  • Famous Singer
  • Fire

संबंधित बातम्या

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य
1

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’
2

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’

Shreya Chaudhary: आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार श्रेया चौधरी; ‘मुपापा’ची रिलीज डेट जाहीर
3

Shreya Chaudhary: आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार श्रेया चौधरी; ‘मुपापा’ची रिलीज डेट जाहीर

Bhootam Bhayam Movie: ‘भूतम भय्यम’च्या कलाकारांमध्ये असं तयार झालं बॉन्डिंग; दिग्दर्शकांनी सांगितला २५ दिवसांच्या वर्कशॉपचा किस्सा
4

Bhootam Bhayam Movie: ‘भूतम भय्यम’च्या कलाकारांमध्ये असं तयार झालं बॉन्डिंग; दिग्दर्शकांनी सांगितला २५ दिवसांच्या वर्कशॉपचा किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.