
फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया
बिग बॉस १८ : आज बिग बॉस १८ चा पहिला विकेंडचा वॉर असणार आहे. यामध्ये सलमान खान पहिल्या आठवड्यामध्ये कोणत्या सदस्याने चांगली कामगिरी केली आणि कोणत्या सदस्याने काहीच केले नाही यावर त्याचे विचार मांडणार आहे. आजच्या भागामध्ये सलमान खान कोणाला फाटकारणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहे. कलर्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये नायरा बॅनर्जीला सलमान खान फाटकारताना दिसत आहे. यावेळी सलमान खानने नायरा सांगितले आहे की तू या आठवड्यामध्ये फक्त चार वेळा दिसली आहेत. तुला जिथे बोलायला हवं होत तिथे बोलली नाहीस आणि नको तिकडे बोलली.
आता दुसरीकडे नवा प्रोमो कलर्सच्या सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आणि अविनाश मिश्रा यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण किचनमध्ये पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावर सलमान खान कोणाची बाजू घेईल आणि कोणाला घरामध्ये फटकारले हे पाहणं महत्वाचं ठरेल.
बिग बॉसच्या घरामध्ये संपूर्ण आठवडाभर सदावर्ते यांनी प्रेक्षकांना पोटभरून हसवलं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी त्याचे विचार बिग बॉस आणि प्रेक्षकांपर्यत पोहोचले आहेत.
या आठवड्यामध्ये पाच घरांमधील सदस्य बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये करणवीर मेहरा, चाहत पांडे, गुणरत्न सदावर्ते, मुस्कान बामणे आणि अविनाश मिश्रा यांच्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. या पहिल्याच आठवड्याच्या कामगिरीवर बोलायचं झालं तर अनुपमा मुस्कान बामणे या घरामध्ये फार काही करू शकली नाही त्यामुळे तिचे घराबाहेर जाण्याचे चान्स जास्त आहेत.