गणपतीच्या मुहूर्तावर दीपिका- रणवीरच्या घरी लक्ष्मीचा जम्न! पोस्ट करत दिली आनंदची बातमी (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. अभिनेत्रि दिपीकाने आज मुलीला जम्न दिला आहे. गणपतीच्या मुहूर्तावर दीपिका आणि रणवीरच्या घरी लक्ष्मीचा जम्न झाला आहे. सोशल मिडीयावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांनी त्यांचं अभिनंदत केलं आहे. काल संध्याकाळी रणवीर आणि दीपिका मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात जाताना दिसले होते. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता.
हेदेखील वाचा- Deepika Padukone Hospitalized: दीपिका पदुकोण हॉस्पिटलमध्ये दाखल, लवकरच मिळणार गोड बातमी
त्यामुळे चाहत्यांना देखील दीपिका आणि रणवीरच्या होणाऱ्या बाळाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. दीपिकाने या वर्षी २८ फेब्रुवारीला प्रेग्नेंसीची घोषणा केली होती आणि ती सप्टेंबरमध्ये बाळाला जन्म देणार असल्याचे सांगितले होते. यामुळे दीपिका आणि रणवीर खूप उत्साहित होते. त्यानंतर आज गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण एका मुलीचे आई- वडील झाले आहेत. रणवीर आणि दीपिकाचे कुटुंबीयही रुग्णालयात उपस्थित आहेत. या खास क्षणापूर्वी दोघेही त्यांच्या आलिशान कारमधून मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. तेव्हापासून या जोडप्याच्या बाळाच्या घोषणेची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.
हेदेखील वाचा- श्रेया बुगडेच्याही घरी गणरायाचे आगमन, पाहा Photos
गणपती बाप्पााच्या आगमनाआधीच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात पोहोचले होते. होणाऱ्या बाळासाठी दीपिका आणि रणवीरने गणपती बाप्पाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर काल दीपिका मुंबईच्या एच.एन.रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. तेव्हापासून दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांना त्यांच्या होणाऱ्या बाळाबद्दल उत्सुकता होती. अभिनेत्री केव्हाही गोड बातमी देईल, अशी चर्चा सुरु होती. आणि अखेर आता ती गोड बातमी सर्वांसमोर आली आहे. दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून दीपिका- रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर दीपिका २८ सप्टेंबरला बाळाला जन्म देणार अशी चर्चा सुरू होती. पण त्या आधीच अभिनेत्रीने गोड बातमी दिली आहे. रणवीरने खास बायकोसाठी बिझी शेड्यूल्डमधून ब्रेक घेतला आहे. सध्या तो आपल्या बायकोची काळजी घेताना दिसत आहे. लग्नाच्या ६ वर्षानंतर दीपिका- रणवीरने गोड बातमी दिली आहे.