दीपिका पदुकोणला आपल्या मुलीला कौटुंबिक वातावरणात वाढवायचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तिच्या मुलीचा चेहरा दिसणारा कोणताही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार नाही.
गणपती बाप्पााच्या आगमनाआधीच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात पोहोचले होते. होणाऱ्या बाळासाठी दीपिका आणि रणवीरने गणपती बाप्पाचे दर्शन घेतले होते. आता त्यानंतर आज हे कपल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. सप्टेंबर महिन्यात अभिनेत्री गुड न्यूज देणार आहे. सप्टेंबर महिन्यात ती केव्हाही गोड बातमी देण्याची शक्यता आहे. अशातच अभिनेत्री आज हॉस्पिटलमध्ये जात असल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – कार्तिक आर्यन ‘लालबागचा राजा’च्या चरणी लीन
काही वेळापूर्वीच दीपिका आणि रणवीर मुंबईच्या एच.एन.रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहे. विरल भयानी ह्या इन्स्टग्राम पेजवर रणवीर आणि दीपिका हॉस्पिटलमध्ये जात असल्याची व्हिडिओ शेअर करण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत रणवीरची आई आणि बहिण सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. अभिनेत्री केव्हाही गोड बातमी देईल, असं सांगितलं जात आहे. दीपिका आणि रणवीर ब्लू मर्सिडिज मेबेक कारने हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. तर रणवीरची आई आणि बहिण सुद्धा ब्लू मर्सिडिज कारने पोहोचले आहेत.
सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून दीपिका- रणवीरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका आणि रणवीर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेतच. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दीपिका २८ सप्टेंबरला बाळाला जन्म देणार अशी चर्चा सुरू होती. पण त्या आधीच अभिनेत्री चाहत्यांना गोड बातमी देण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये दीपिका गणेश चतुर्थीच्या दिवशी गोंडस बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे. रणवीरने खास बायकोसाठी बिझी शेड्यूल्डमधून ब्रेक घेतला आहे. सध्या तो आपल्या बायकोची काळजी घेताना दिसत आहे. लग्नाच्या ६ वर्षानंतर दीपिका- रणवीर गोड बातमी देणार आहेत.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, दीपिका शेवटची ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर रणवीर ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर आता लवकरच अभिनेता ‘डॉन ३’ आणि ‘सिंघम अगेन’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, दीपिका पदुकोणने २०१८ मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केले होते. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. त्याचवेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ’83’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले. त्यांचे हे चित्रपट सुपरहिट देखील ठरले.