Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्पसोबत ‘शांतता चर्चे’साठी बमन इराणी सज्ज; ‘सिलेंडर घेऊन दादरला या’ म्हणत शेअर केला मजेदार व्हिडिओ

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर, बोमन इराणी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विनोदी टोला लगावणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. इराणी डोनाल्ड ट्रम्पला काय म्हणाले जाणून घेऊ.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 26, 2026 | 01:43 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्पसोबत ‘शांतता चर्चे’साठी बमन इराणी सज्ज
  • सिलेंडरवरून शेअर केला मजेदार व्हिडिओ
  • बोमन इराणी यांनी विनोदाने केली टीका
जगभरात सुरू असलेल्या तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, बॉलीवूड अभिनेता बोमन इराणीने आपल्या खास शैलीत वातावरण हलकेफुलके केले आहे. अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर इतका मजेशीर टोला लगावला की, लोक हसून लोटपोट झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

बोमन इराणी यांनी विनोदाने केली टीका

सध्याच्या अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर बोमन इराणी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. व्हिडिओ शेअर करताना बोमन यांनी कॅप्शन लिहिले की, “इराणी लोक शांतता चर्चेसाठी श्री. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास तयार आहेत.” त्यांच्या विनोदी शैलीतील या वक्तव्याने गंभीर वातावरणात विनोदाची झालर घातली.

The Furious: ‘धुरंधर’ला खाऊन टाकेल असा हा थ्रिलर स्पाय चित्रपट; ट्रेलरनेच दिली ‘ॲनिमल’ आणि ‘मार्को’ला टक्कर

व्हिडिओमध्ये बोमन इराणी मिश्किलपणे म्हणाले, “तर, तुम्हाला माहीतच आहे की, श्री. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणी लोकांशी बोलायचे आहे. त्यांनी असे संकेत दिले आहेत की तीन जणांना आमंत्रित करण्यात आले आहे. चर्चा सुरू आहे: स्मृती इराणी, अरुणा इराणी आणि मी, बोमन इराणी. मी तयार आहे; आम्ही शांततेसाठी काहीही करू शकतो.”

 

गॅस सिलेंडरचा तुटवडा

मात्र, बामन इथेच थांबले नाहीत. त्यांनी भारतातील सध्याच्या एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यावरही भाष्य केले. ते पुढे म्हणाले, “माझी एकच अडचण आहे की मी वॉशिंग्टनला जाणार नाही. मला वाटते की श्री. ट्रम्प आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळ इथे दादर-पारसी कॉलनीत येतील आणि आपण जेवण-खाण करू. आपण त्यांना धन्सक आणि कस्टर्ड खाऊ घालू. आणि जर श्री. ट्रम्प एक मोठा गॅस सिलेंडर घेऊन आले, तर आपले जीवन अधिक सोपे होईल.”

संजय दत्तचा ‘आखरी सवाल’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; प्रभावी पोस्टरने वाढली उत्सुकता

बोमनच्या व्हिडिओमुळे चाहते खळखळून हसत आहेत, तर अनेक सेलिब्रिटी त्याच्या विनोदी स्वभावाचे कौतुकही करत आहेत. अभिनेता-नर्तक जावेद जाफरीने कमेंट्समध्ये बोमनच्या नावाला ‘बॉम्ब’ हा शब्द जोडून लिहिले, “माझ्या प्रिय बोमन इराणी, जर तुम्ही स्वतःला ‘बॉम्बॉन इराणी’ म्हणवून घेतले आणि कस्टर्ड गॅसचा फॉर्म्युला शेअर करण्याबद्दल बोललात, तर कदाचित ट्रम्प दादरालँडला येण्याचा प्रयत्न करतील.” तब्बूने त्याच्या आडनावावर विनोद करत त्याला ‘इराणी’ ऐवजी ‘इराण’ म्हटले. मात्र, युझर्सनी सुचवले, “कृपया होर्मुझलाही आमंत्रित करा, कारण ट्रम्प त्याच्यावर खूपच फिदा आहेत.” काही जण बोमनच्या पारशी विनोदाचे कौतुक करत आहेत. बोमनने खरोखरच या तणावपूर्ण वातावरणात विनोदाची एक वेगळीच छटा आणली आहे.

Web Title: Boman irani satire video on donald trump us iran tension lpg gas cylinder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • entertainment

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
3

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
4

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.