(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या बॉलीवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करून चाहत्यांना प्रभावित करत आहे. तिच्या आगामी हॉलिवूड “द ब्लफ” चित्रपटासाठी ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. ती कार्ल अर्बनसोबत या चित्रपटामध्ये ॲक्शन भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीने नुकतेच इन्स्टाग्रामवर “द ब्लफ” मधील तिच्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती पूर्ण ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. हा चित्रपट १८०० च्या दशकात घडणार आहे. प्रियांका चोप्राचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि तिच्या लूकमुळे चाहत्यांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.
चित्रपटातील अभिनेत्रीचा लूक व्हायरल
प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एर्सेल बोडेनची भूमिका साकारत आहे. हे पात्र “ब्लड मेरी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्री रक्षकापासून प्रेरित आहे. फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा देखील समुद्री रक्षकाच्या लूकमध्ये दिसत आहे. हातात तलवार आणि विस्कटलेले केस असलेली प्रियांका खूप क्लासी अंदाजात दिसते आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, अभिनेत्री रक्ताने माखलेली आहे आणि हातात बंदूक धरलेली दिसत आहे. इतर फोटोंमध्ये समुद्रकिनारा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँक ई. फ्लॉवर्स दिसत आहेत.
हा चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
प्रियांका चोप्राचा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना समुद्री रक्षकाचे एक साहस अनुभवायला मिळणार आहे, ज्यामध्ये समुद्री रक्षकाची काळी आणि अॅक्शनने भरलेली बाजू दाखवली जाणार आहे. “द ब्लफ” हा चित्रपट “ब्लड मेरी” च्या जीवनावर प्रकाश टाकणारा आहे. ती तिचा हिंसक भूतकाळ मागे सोडून आव्हानांना तोंड देत तिचे नवीन जीवन कसे सुरू करते हे सगळं यामध्ये दाखवण्यात आले आहे. अभिनेत्रीच्या खास लूकनेही प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट
“द ब्लफ” चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रा, कार्ल अर्बन, इस्माइल क्रूझ कॉर्डोवा, सफिया ओकली-ग्रीन आणि टेमुएरा मॉरिसन यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळाल्या आहेत. फ्रँक ई. फ्लॉवर्स दिग्दर्शित या चित्रपटात भरपूर अॅक्शन आहे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रियांका चोप्राचा हा पहिला हॉलिवूड प्रोजेक्ट नाही; अभिनेत्रीने यापूर्वी “बेवॉच”, “द मॅट्रिक्स रिझरेक्शन्स” आणि “लव्ह अगेन” सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने “सिटाडेल” सारख्या वेब सिरीजमध्येही काम केले आहे. त्यामुळे आता या चित्रपटामधील तिचे धाडसी काम पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक आहेत.






