Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yo Yo Honey Singh च्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान उडाला गोंधळ; स्टाफ-प्रेक्षकांमध्ये झाली हाणामारी

शनिवारी गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग एका संगीत कार्यक्रमात सादरीकरण करत असताना प्रायोजक संघातील सदस्य आणि सामान्य लोकांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. ज्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 15, 2026 | 03:46 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • यो यो च्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान उडाला गोंधळ
  • स्टाफ-प्रेक्षकांमध्ये झाली हाणामारी
  • यो यो हनी सिंग पुन्हा अडचणीत
 

गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग यांनी शनिवारी, १४ मार्च रोजी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे त्यांच्या ‘माय चॅप्टर – इंडिया टूर’ची सुरुवात केली. कॉन्सर्टचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी‘देसी कलाकार’, ‘ब्लू आईज’, ‘सनी सनी’, ‘लुंगी डान्स’, ‘मिलियनेअर’, ‘डोप शॉप’ आणि ‘ब्राऊन रंग’ यांसारखी लोकप्रिय गाणी सादर केली. मात्र, वृत्तांनुसार कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांमध्ये आणि शोच्या प्रायोजक टीममधील काही सदस्यांमध्ये वाद झाला आणि त्यातून मोठी झटापट झाल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

एका इन्स्टाग्राम हँडलवर शेअर झालेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये यो यो हनी सिंगच्या कॉन्सर्टदरम्यान प्रायोजक टीममधील सदस्य आणि काही लोकांमध्ये झालेली हिंसक झटापट दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांना आक्रमकपणे मारहाण करताना दिसत आहेत. गर्दीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असतानाही, गायकाला या भांडणाची कल्पना नसल्यासारखे वाटत होते आणि या सगळ्या गोंधळात गायकाने आपला परफॉर्मन्स सुरूच ठेवला, असेही सांगितले जात आहे.

”हेट स्टोरी’नंतर लोक माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले’; zareen khanचा बॉलीवूड दिग्दर्शकाबद्दल धक्कादायक खुलासा

दिल्ली पोलिसांनी परिस्थितीवर मिळवले नियंत्रण

दिल्ली पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच अनेक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भांडण आणखी वाढू नये म्हणून ते शांत करण्यासाठी मदत केली. दिल्लीतील कार्यक्रमानंतर यो यो हनी सिंगने २१ मार्च रोजी अहमदाबाद येथे, त्यानंतर २८ मार्च रोजी मुंबईमध्ये, ४ एप्रिल रोजी पुणे येथे, ११ एप्रिल रोजी कोटामध्ये, २५ एप्रिल रोजी इंदूर येथे, २ मे रोजी लखनौमध्ये आणि ९ मे रोजी कोलकातायेथे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर १६ मे रोजी बंगळूर येथे त्यांच्या या टूरचा समारोप होणार आहे.

 

हनी सिंग अडकला अडचणीत

या वर्षाच्या सुरुवातीला यो यो हनी सिंगने दिल्लीतील नानकू-करुण यांच्या कॉन्सर्टमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. मंचावरून बोलताना त्याने थंडीच्या हवामानामुळे अश्लील टिप्पणी केली होती. त्याच्या या वक्तव्यामुळे अनेकांना ते अजिबात पसंत पडले नाही आणि रॅपरने वापरलेल्या शब्दांवर अनेकांनी टीका केली.

OSCAR 2026 मध्ये प्रेझेंटर बनून रंगमंचावर चमकणार बॉलिवूडची ‘देसी गर्ल’, भारतात कधी, कुठे पाहता येईल अवॉर्ड्स सोहळा? जाणून घ्या

तसेच पुढे, १५ जानेवारी रोजी यो यो हनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून माफी मागितली होती. आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देताना त्याने म्हटले, “मी त्या शोमध्ये फक्त एक पाहुणा होतो. कॉन्सर्टच्या सुमारे दोन दिवस आधी मी काही स्त्रीरोग तज्ज्ञ आणि लैंगिक आरोग्य तज्ज्ञांसोबत दुपारचे जेवण केले होते. त्या वेळी आमच्यात चर्चा झाली आणि त्यांनी मला सांगितले की तरुण पिढी लैंगिक संसर्गजन्य आजारांमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे.”

Web Title: Chaos erupts in yo yo honey singh concert fight between staff and crowd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Famous Singer

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Kishor Kumar Song Ban : 01 वर्षे सरकारी माध्यमांवर बंदी करण्यात आली होती गाणी ? कोण होता तो गायक , कोणत्या गायकाची गाणी होती बंद
4

Kishor Kumar Song Ban : 01 वर्षे सरकारी माध्यमांवर बंदी करण्यात आली होती गाणी ? कोण होता तो गायक , कोणत्या गायकाची गाणी होती बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.