(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)
सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ या चित्रपटाची सध्या खूप चर्चा होत आहे. हा या वर्षीच्या सर्वात प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अलीकडेच, चित्रपटाचे काही बीटीएस फोटो समोर आले आहे. जे पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. त्याचवेळी, आता चित्रपटाच्या ओटीटी डीलबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. तसेच हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मला कोटीमध्ये विकला गेला आहे.
रजनीकांतचा ओटीटीवर विकला गेलेला सर्वात महागडा चित्रपट
कोइमोईच्या वृत्तानुसार, अमेझॉन प्राइम व्हिडिओने या चित्रपटाचे डिजिटल राइट्स १२० कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. तथापि, अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. रजनीकांतच्या कोणत्याही चित्रपटासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओटीटी करार आहे. यापूर्वी त्यांच्या सुपरहिट चित्रपट ‘जैलर’चे डिजिटल राइट्सही अमेझॉन प्राइमने १०० कोटी रुपयांना खरेदी केले होते.
AR Rahman: ए.आर. रहमान चेन्नईच्या रुग्णालयात दाखल, गायकाची बिघडली तब्येत!
‘कुली’ मध्ये दिसणार रजनीकांतचा अॅक्शन अवतार
लोकेश कनागराज यांच्या दिग्दर्शनाखाली बनवण्यात येणारा ‘कुली’ हा चित्रपट धमाकेदार अॅक्शनने भरलेला असण्याची अपेक्षा आहे. चित्रपटाची कथा सध्या पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली आहे, परंतु असे मानले जाते की रजनीकांतच्या व्यक्तिरेखेत थोडीशी नकारात्मक रंगछटा दिसू शकते. तसेच या चित्रपटामध्ये अभिनेत्याचा नवा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.
चित्रपटामध्ये दिसणार हे कलाकार
रजनीकांत व्यतिरिक्त, नागार्जुन अक्किनेनी आणि उपेंद्र राव सारखे मोठे स्टार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. या चित्रपटात श्रुती हासन, सौबिन शाहीर आणि सत्यराज हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. खास गोष्ट म्हणजे पूजा हेगडे एका खास डान्स नंबरमध्ये दिसणार आहे. तसेच बॉलिवूडस्टार आमिर खान देखील या चित्रपटाचा विशेष भाग बनणार आहे.
‘वॉर २’ सोबत कोणताही संघर्ष होणार नाही
काही काळापूर्वी असे वृत्त आले होते की ‘कुली’ची रिलीज डेट हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘वॉर २’ चित्रपटाशी टक्कर घेऊ शकते. तथापि, नवीनतम माहितीनुसार, असे होणार नाही. दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच प्रेक्षकांना दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या दिवशी पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.
The Raja Saab: मोठ्या पडद्यावर कधी प्रदर्शित होणार ‘द राजा साब’? चित्रपटाबाबत नवीन अपडेट समोर!
रजनीकांत यांचे आगामी चित्रपट
अलिकडेच रजनीकांत ‘वेट्टाय्यान’ चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट टीजे ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केला होता. या पोलिस अॅ क्शन ड्रामामध्ये त्यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ‘कुली’ व्यतिरिक्त, रजनीकांत ‘जेलर २’ मध्ये देखील दिसणार आहेत. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या सिक्वेलमध्ये तो पुन्हा एकदा टायगर मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत परतणार आहे. ‘जैलर’च्या प्रचंड यशानंतर चाहते त्याच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.