(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडचा भाईजान सध्या त्याच्या ‘बिग बॉस १९’ या रिॲलिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, त्याच्या ‘दबंग’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी भाईजानबद्दल वादग्रस्त विधान करून सर्वांना धक्का दिला आहे. अभिनव यांनी त्यांच्या वक्तव्यात सलमान खानवर जोरदार टीका केली आहे आणि त्याला खूप वाईट म्हटले आहे. अभिनव यांनी सलमान खानला गुंड आणि वाईट वर्तनाचा माणूस देखील म्हटले आहे. इतकेच नाही तर अभिनव यांनी सलमान खान तसेच खान कुटुंबावरही निशाणा साधला आहे. अभिनव नक्की काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.
अभिनवने सलमान खानबद्दल काय म्हटले?
स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत अभिनवने सलमान खानबद्दल अनेक दावे केले आहे. अभिनवने अभिनेत्यावर टीका करताना म्हटले की, ‘सलमान खान कधीही कोणत्याही कामात अडकत नाही आणि त्याला अभिनयात रस देखील नाही. गेल्या २५ वर्षांत त्याने अभिनयात रस दाखवलेला नाही. जेव्हा तो चित्रपटाच्या सेटवर येतो तेव्हा असे वाटते की त्याने शूटिंगला येऊन उपकार केले आहेत. त्याला अभिनयाच्या जगात राहण्याची खूप आवड आहे पण अभिनयात त्याला रस नाही. तो एक गुंड आणि असभ्य व्यक्ती आहे.’ असे ते या मुलाखतीत म्हणाले आहे.
खान कुटुंबावरही साधला निशाणा
मुलाखतीत बोलताना अभिनव इथेच थांबले नाही तर त्यांनी खान कुटुंबावरही निशाणा साधला. अभिनव म्हणाला, ‘तो एका चित्रपट कुटुंबातील आहे जो ५० वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे. या कुटुंबाने बॉलीवूडमध्ये स्टार सिस्टम सुरू केली आणि भविष्यातही ते ही प्रक्रिया सुरू ठेवतील. जर तुम्ही त्यांच्या कोणत्याही शब्दावर त्यांच्याशी असहमत असाल तर ते तुमच्या मागे येतील. हे लोक फक्त सूडाच्या भावनेने काम करतात.’
अनुराग कश्यपने दिला होता सल्ला
अभिनव कश्यप अनुराग कश्यपचा धाकटा भाऊ आहे. मुलाखतीत अभिनवने असेही सांगितले की त्याचा भाऊ अनुरागने दबंग बनवण्यापूर्वी त्याला इशाराही दिला होता. अनुराग कश्यपबद्दल बोलताना अभिनव म्हणाला, ‘जेव्हा तो तेरे नामची पटकथा लिहित होता तेव्हा सलमान खानसोबतच्या मतभेदामुळे त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. यानंतर, जेव्हा मी सलमानसोबत चित्रपट बनवण्याचा विचार केला तेव्हा अनुरागने मला इशारा दिला आणि म्हटले की तू सलमानसोबत चित्रपट बनवू शकणार नाहीस. जरी त्यावेळी अनुरागने मला तो असे का म्हणत होता याचे कारण सांगितले नव्हते. पण नंतर मला ते स्वतः समजले.’
‘नॉमिनेशन होऊदेत मग सांगते…’ तान्या मित्तलने कुनिकाला दिली धमकी; ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा राडा
दबंग नंतर अभिनवने हे चित्रपट केले दिग्दर्शित
अभिनवच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ‘दबंग’पूर्वी त्यांनी रणबीर कपूरचा ‘बेशरम’ चित्रपटही दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. रणबीर कपूरसोबत पल्लवी शारदा, ऋषी कपूर आणि नीतू कपूर मुख्य भूमिकेत होते. तसेच, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता त्यांच्या या मोठ्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे.