(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Rick Davies Died: ब्रिटिश संगीतकार रिक डेव्हिस यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कुनिका आणि तान्यामध्ये सुरु झाला वाद
कलर्स टीव्हीच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आगामी एपिसोडमधील आहे. या व्हिडिओमध्ये तान्या भेंडी कापत आहे, तिला एक किडा दिसतो, ती म्हणते, ‘मी पहिल्यांदाच भेंडीचा किडा पाहिला आहे.’ यावर कुनिका म्हणते की जर तुम्ही स्वयंपाकघरात काम केले तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. यावर तान्याला राग येतो, ती म्हणते की तुमचा वाद स्वयंपाकघरातूनच का सुरू होतो. शिवाय, दोघेही अनेक गोष्टींवर वाद घालतात. तान्या म्हणते की कुनिका अनेकदा तिच्या संगोपनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. शेवटी ती म्हणते, ‘जेव्हा नॉमिनेशनचा दिवस येईल तेव्हा मी तुम्हालाउत्तर देईल.’
तान्याने फरहानाला साप म्हटले
रविवारी वीकेंड का वार भागात तान्या मित्तलनेही फरहानावर आरोप केले. तान्याने होस्ट सलमान खानसमोर म्हटले की, ‘जी मुलगी (फरहाना) इतर मुलींना सांगते की तुमचा दर्जा काय आहे, तीच सर्वात जास्त विष पसरवत आहे.’ या कारणास्तव तान्याने फरहानाला साप म्हटले. तान्या मित्तल ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे जी धार्मिक स्थळांना भेट देते आणि त्यावर कंटेंट तयार करते.स्वतःचे खूप श्रीमंत म्हणून देखील वर्णन करते. ती ‘बिग बॉस १९’ च्या स्पर्धकांना तिच्या श्रीमंत असण्याची सारखी जाणीव करून देत असते.
गेल्या दोन आठवड्यात एकही एलिमिनेशन झालेले नाही. अलिकडच्या वीकेंड का वारमध्ये कुन्निका सदानंदला कमी मते मिळाली पण तिने तिच्या विशेष शक्तीचा वापर करून स्वतःला घराबाहेर काढण्यापासून वाचवले. तसेच वीकेंड का वारमध्ये, एका नव्या वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाले, ज्याचे नाव आहे शाहबाज बदेशा. शाहबाज बदेशा आता घरातील प्रत्येक सदस्यांसोबत कसा खेळतो आणि त्याला प्रेक्षकांचे काय प्रेम मिळते हे पाहणे बाकी आहे.






