
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“दलदल” या क्राईम थ्रिलर मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मुंबई शहरात घडणारा “दलदल” ही वेब सीरिज डीसीपी रीता फरेरा (भूमी) भोवती फिरते आहे, जी एका क्रूर सिरीयल किलरला पकडण्यासाठी धोकादायक तपासाला सुरुवात करते. सिनेसृष्टीतील सिरियल किलर हा प्रकार नेहमीच चित्रपटप्रेमींचा आवडता राहिला आहे. या यादीत नवीनतम भर म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरची आगामी वेब सिरीज, ‘दलदल’, ज्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. निर्मात्यांनी आता ‘दलदल’चा नवीनतम ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यामध्ये हिंसाचार आणि क्रूरतेने भरलेले दृश्ये दिसून येत आहे.
‘दलदल’चा हा ट्रेलर पाहण्यासाठी प्रेक्षकांना मजबूत हृदयाची आवश्यकता आहे. भूमी पेडणेकरच्या आगामी सिरियल किलर थ्रिलर मालिकेचा ट्रेलर मध्ये नक्की काय दाखवले आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. तसेच चाहते भूमीला एका वेगळ्या भूमिकेत पाहून थक्क झाले आहेत.
“दलदल” वेब सीरिजचा ट्रेलर
ट्रेलरमध्ये डीसीपी रीता फरेरा (भूमी) यांच्या भयानक जगातल्या प्रवासाचे चित्रण केले आहे, ज्याची भूमिका भूमी सतीश पेडणेकर यांनी एका दमदार अभिनयाने साकारली आहे. ट्रेलरमध्ये क्रूर आणि पूर्वनियोजित खून उघडकीस आले आहेत, ज्यामुळे मारेकऱ्याचे कुरूप हेतू उघड होताना दिसत आहे. मृतांची संख्या वाढत असताना, रीता स्वतःला या अंधाऱ्या आणि भयानक तपासात खोलवर ओढते आणि या सगळ्याचा तपास सुरु करते.
Sai Pallavi बोल्ड कपडे का घालत नाही? कॉलेजमधील ‘त्या’ घटनेनंतर अभिनेत्री घेतला मोठा निर्णय
“दलदल” कधी आणि कुठे होणार प्रदर्शित?
“दलदल” ही मालिका विश धामिजा यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तक “भेंडी बाजार” वर आधारित आहे. ही मालिका अमृत राज गुप्ता दिग्दर्शित आहे, विक्रम मल्होत्रा आणि सुरेश त्रिवेणी निर्मित आहे आणि श्रीकांत अग्निश्वरन, रोहन डिसूझा आणि प्रिया सग्गी यांनी लिहिलेली आहे. भूमी सतीश पेडणेकर सोबत, या मालिकेत समारा तिजोरी आणि आदित्य रावल देखील आहेत. “दलदल” चा प्रीमियर ३० जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते आता खूप उत्सुक आहेत.