Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DDLJ ला ३० वर्षे पूर्ण! लंडनमध्ये राज-सिमरनच्या कांस्य प्रतिमेचे अनावरण; शाहरुख खानला आजही आश्चर्य!

Raj Simran Statue: चित्रपटाच्या ३० वर्षांच्या पूर्तीनिमित्त लंडनमधील लीसेस्टर स्क्वेअर येथे राज आणि सिमरनच्या कांस्य प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. जागतिक सन्मानामुळे शाहरुख खान आणि काजोल आनंदित झाले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 05, 2025 | 05:57 PM
DDLJ ला ३० वर्षे पूर्ण! लंडनमध्ये राज-सिमरनच्या कांस्य प्रतिमेचे अनावरण (Photo Credit- X)

DDLJ ला ३० वर्षे पूर्ण! लंडनमध्ये राज-सिमरनच्या कांस्य प्रतिमेचे अनावरण (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • राज आणि सिमरनचा जगभर दबदबा!
  • ‘DDLJ’ ने ३० वर्षे पूर्ण करताच लंडनमध्ये कांस्य प्रतिमा
  • गौरव मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट
DDLJ Completes 30 Years: साल १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (DDLJ) या कल्ट क्लासिक चित्रपटाने ३० वर्षे पूर्ण केली आहेत. केवळ भारतातच नाही, तर जगभरात राज (Shah Rukh Khan) आणि सिमरन (काजोल) यांची जोडी एक आयकॉनिक जोडी म्हणून उदयास आली आहे. या चित्रपटाच्या ३० वर्षांच्या पूर्तीनिमित्त लंडनमधील लीसेस्टर स्क्वेअर (Leicester Square) येथे राज आणि सिमरनच्या कांस्य प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. आपल्या चित्रपटाला मिळालेल्या या जागतिक सन्मानामुळे शाहरुख खान आणि काजोल दोघेही आनंदित झाले आहेत.


शाहरुख खानला आजही आश्चर्य

आपल्या चित्रपटाच्या विक्रमी यशावर बोलताना अभिनेता शाहरुख खान म्हणाला की, चित्रपट इतका सुपरहिट होईल, असे त्यांना अजिबात वाटले नव्हते.

“अशा सिनेमाचा भाग होण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. खरं सांगायचं तर, ‘DDLJ’ लोकांच्या हृदयात इतकी मोठी जागा मिळवेल, असा विचार आमच्यापैकी कोणीही केला नव्हता. आदि (आदित्य चोप्रा) आणि इतरांना वाटले असेल की हा एक चांगला चित्रपट आहे आणि लोकांना तो आवडेल, पण मला वाटत नाही की कोणी विचार केला असेल की चित्रपट सर्व रेकॉर्ड तोडेल.”

हे देखील वाचा: Shahrukh Khanचा डबल धमाका! ६ ब्लॉकबस्टर चित्रपट OTTवर ट्रेंडिंग, कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले

ब्रिटनला श्रेय

शाहरुख खान पुढे म्हणाला की, काजोल आणि माझ्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपट उद्योगासाठीही हा पुतळा महत्त्वाचा आहे.

“युके, लंडन एका अर्थाने आमच्या स्टारडमसाठी मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. कारण आम्ही आमच्या देशात इतर अभिनेत्यांसारखे चांगले काम करत होतो, पण मला वाटते की आम्ही परदेशातील, विशेषतः युकेसारख्या बाजारपेठांमध्ये खूप चांगले काम करायला सुरुवात केली आणि त्यावर आपला ठसा उमटवला.”

शूटिंगच्या आठवणी

चित्रपटाच्या निर्मितीबद्दल बोलताना शाहरुख खानने सांगितले की, चित्रपटाची सुरुवात ६ तरुणांपासून झाली होती. त्यावेळी आदित्य चोप्रा आणि करण जोहर सहायक दिग्दर्शक होते.

“३० ते ४० दिवसांचा प्रवास खूप मजेशीर होता आणि आम्ही स्वित्झर्लंड आणि इंग्लंडमध्ये चित्रपटाचे शूटिंग वेगाने पूर्ण केले. लीसेस्टर स्क्वेअरमध्येही आम्ही शूटिंग केले होते आणि गुपचूप निघून गेलो होतो. पण आता, भारतीय चित्रपटांना जगभर ओळख देणाऱ्या ब्रिटनमध्ये या चित्रपटाला इतका सन्मान मिळणे ही गर्व करण्यासारखी गोष्ट आहे.”

गौरव मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट लीसेस्टर स्क्वेअरवर प्रतिमा (स्टॅच्यू) लावून सन्मानित होणारा पहिली भारतीय फिल्म आहे. यापूर्वी ‘हॅरी पॉटर’, ‘मेरी पॉपीन्स’, ‘पॅडिंग्टन’, आणि ‘सिंगिंग इन द रेन’ यांसारख्या ऐतिहासिक हॉलिवूड चित्रपटांना या ठिकाणी स्थान मिळाले आहे.

हे देखील वाचा: Sudan Kidnapping: सुदानमध्ये ओडिशाच्या आदर्शचे अपहरण; शाहरुख खानशी आहे कनेक्शन?

Web Title: Ddlj completes 30 years bronze statue of raj simran unveiled in london

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • Bollywood
  • London
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

‘रातो की नींद हराम…’, राज निदिमोरू आणि समांथाच्या लग्नावर Ex पत्नी श्यामलीने आता सोडले मौन!
1

‘रातो की नींद हराम…’, राज निदिमोरू आणि समांथाच्या लग्नावर Ex पत्नी श्यामलीने आता सोडले मौन!

‘वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न…’ मलायका अरोराने Ex पती अरबाज खानचे नाव न घेता साधला निशाणा!
2

‘वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न…’ मलायका अरोराने Ex पती अरबाज खानचे नाव न घेता साधला निशाणा!

‘केसात गजरा, डोळ्यात प्रेम…’ लाल साडीत खुलून दिसले समांथाचे सौंदर्य; पाहा Bridal Look
3

‘केसात गजरा, डोळ्यात प्रेम…’ लाल साडीत खुलून दिसले समांथाचे सौंदर्य; पाहा Bridal Look

Happy Patel : आमिर खानने केली आगामी चित्रपटाची घोषणा, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत
4

Happy Patel : आमिर खानने केली आगामी चित्रपटाची घोषणा, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.