Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या टॅलेंटसाठी मोठी संधी! दीपिका पादुकोणच्या ‘Onset Program’ ची पहिली टीम जाहीर

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने येणाऱ्या नव्या पिढीसाठी नवा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने 'Onset Program' तिच्या या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 16, 2026 | 03:34 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Follow Us:

आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्री, निर्माती आणि मेंटल हेल्थ ॲडव्होकेट दीपिका पादुकोणने मनोरंजन क्षेत्रातील पुढील पिढीतील क्रिएटिव्ह प्रोफेशनल्स घडवण्यासाठी सुरू केलेल्या आपल्या उपक्रमाबाबत एक महत्त्वाची अपडेट शेअर केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत दीपिका पादुकोणने तिच्या ‘Create With Me – Onset Program’ साठी आलेल्या मोठ्या संख्येतील अर्जांची छाननी करताना मिळालेला अनुभव सांगितला. गेल्या काही महिन्यांत हे काम अत्यंत मेहनतीचे होते, मात्र तितकेच प्रेरणादायीही असल्याचे अभिनेत्रीने नमूद केले.

व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले, “गेल्या तीन महिन्यांत खूप मेहनत झाली, अर्जांची गुणवत्ता पाहून मी आणि माझी टीम अक्षरशः आश्चर्यचकित झालो. त्यातून सर्वोत्तम टॅलेंट निवडणे ही मोठी जबाबदारी होती. तुमच्यापैकी अनेकांशी बोलण्याची आणि तुम्हाला जवळून जाणून घेण्याची संधी खूप छान होती. आमच्या ‘Create With Me – Onset Program’ च्या पहिल्या ग्रुप (Cohort) विषयी लवकरच माहिती देणार आहोत.”

५ वर्षांनंतर मालिकेत पुनरागमन; शर्वरीच्या उर्जेशील स्वभावासाठी अभिनेत्री चिन्मयी साळवी ने केली ‘ही’ खास तयारी!

हे अपडेट दीपिका पादुकोणने तिच्या वाढदिवसानिमित्त Onset Program ची घोषणा केल्यानंतर काही महिन्यांनी शेअर केले आहे. उदयोन्मुख टॅलेंटला संधी देणे आणि मनोरंजन क्षेत्रात नवीन क्रिएटिव्ह लोकांसाठी दारे उघडणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम त्यांच्या ‘Create With Me’ या प्लॅटफॉर्मचा भाग असून, सहकार्याने काम करणे आणि खऱ्या कथांना प्रोत्साहन देणे यावर त्याचा भर आहे.

 

या Onset Program च्या माध्यमातून फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रत्यक्ष काम शिकण्याची संधी मिळणार आहे. यात सहभागी होणाऱ्यांना रायटिंग, दिग्दर्शन, कॅमेरा, लाइटिंग, एडिटिंग, साउंड डिझाईन, आर्ट डिझाईन, आर्ट डायरेक्शन, कॉस्च्युम डिझाईन, हेअर स्टायलिंग, मेकअप आणि प्रोडक्शन अशा विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

हा उपक्रम सुरू करताना दीपिका पादुकोण यांनी स्पष्ट केले होते की, गेल्या वर्षी ‘Create With Me’ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर ही कल्पना त्यांच्या मनात आली. कथांना व्यासपीठ देणे आणि लेखक, दिग्दर्शक तसेच उदयोन्मुख निर्मात्यांसारख्या क्रिएटिव्ह व्यक्तींना पुढे आणणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

कॉमेडीचा फुल डोस! Punah Ekda Saade Maade Teen चा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

दीपिकाच्या मते, Onset Program हा केवळ प्रशिक्षण देणारा प्लॅटफॉर्म नसून एक प्रकारचा लॉन्चपॅड आहे. यात सहभागी होणाऱ्या तरुणांना प्रत्यक्ष सेटवर अनुभवी व्यावसायिकांसोबत काम करत प्रॅक्टिकल अनुभव मिळेल. तसेच ज्यांच्याकडे आधीपासून कौशल्य आहे, त्यांना भविष्यात स्वतःचे प्रोजेक्ट्स लीड करण्यासाठी सक्षम बनवणे हा देखील या उपक्रमाचा उद्देश आहे.

हा कार्यक्रम गेल्या वर्षीच्या त्या पायाभरणीवर उभा आहे, जेव्हा दीपिका पादुकोणने “Create With Deepika Padukone: Pitch Format” च्या माध्यमातून लोकांना त्यांच्या आयडिया आणि कॉन्सेप्ट्स शेअर करण्यासाठी आमंत्रित केले होते. आता प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या स्वरूपात Onset Program या सहकार्याला आणखी एक पाऊल पुढे नेत आहे. यात नवोदित टेक्निशियन आणि क्रिएटिव्ह लोकांना इंडस्ट्रीतील अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक सेटवर काम करत शिकण्याची संधी मिळणार आहे.

काही महिन्यांच्या स्क्रीनिंग आणि उमेदवारांशी संवादानंतर आता अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. दीपिका पादुकोणने सूचित केले आहे की या कार्यक्रमाच्या पहिल्या ग्रुपची (Cohort) घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. भारतीय मनोरंजन क्षेत्रातील नव्या टॅलेंटला घडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Web Title: Deepika padukone onset program first cohort announced new talent opportunity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Bollywood
  • Deepika Padukone
  • entertainment

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.