Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Dhurandhar 2’चे कौतुक करत अमीषा पटेलने इंडस्ट्रीवर साधला निशाणा; “खऱ्या कलाकरांना घ्या” म्हणत केली टीका

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' च्या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर, अमिशा पटेलने बॉलीवूडलला आरसा दाखवला आहे. आदित्य धरच्या चित्रपटाचे उदाहरण देत ती म्हणाली की, इंडस्ट्रीने ' इन्फ्लुएन्सर' ऐवजी 'खऱ्या कलाकारांना' घेतले पाहिजे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 25, 2026 | 12:16 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अमीषा पटेलने केले ‘धुरंधर २’चे कौतुक
  • बॉलीवूड इंडस्ट्रीवर साधला निशाणा
  • टीका करत शेअर केली पोस्ट
 

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त एकाच नावाची चर्चा आहे: ‘धुरंधर २’. रणवीर सिंगच्या या चित्रपटाने केवळ कमाईचे सर्व विक्रम मोडले नाहीत, तर चित्रपटसृष्टीतील दिग्गजांचीही मने जिंकली आहेत. आता ‘गदर’ फेम अभिनेत्री अमिशा पटेलनेही या चित्रपटाची प्रशंसा करून बॉलीवूडमधील इंडस्ट्रीवर टीका केली आहे.

अमिशा पटेलने तिच्या ‘X’ अकाउंट या सोशल मीडिया हँडलवर या चित्रपटाला “डोळे उघडणारा” म्हटले आहे. तिने दिग्दर्शक आदित्य धरवर कौतुकाचा वर्षाव करत म्हटले की, चित्रपटसृष्टीने “प्रोजेक्ट्स” बनवणे थांबवून “चित्रपट” बनवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

अमिषाने तिच्या ट्वीटमध्ये काय लिहिले जाणून घेऊ

बॉलीवूडमधील सध्याच्या ट्रेंडवर निशाणा साधत अमिषाने लिहिले, “इंडस्ट्री धुरंधरचे कौतुक करत आहे हे पाहून खूप छान वाटते. निर्मात्यांनी हे समजून घेतले पाहिजे की आदित्यने एक चित्रपट बनवला आहे, केवळ एक प्रोजेक्ट नाही. त्याने खऱ्या कलाकारांना कास्ट केले आहे, केवळ पार्ट्यांमध्ये ट्रेंड करणाऱ्या इन्फ्लुएन्सरर्सला नाही. प्रोजेक्ट्स बनवणे थांबवा आणि चित्रपट बनवायला सुरुवात करा.” असे लिहून अभिनेत्रीने इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे.

Dhurandhar 2 मधील ‘पिंडा’ चे पात्र खऱ्या आयुष्याशी संबंधित? उदयबीर संधूच्या दमदार भूमिकेची सर्वत्र चर्चा

रजनीकांतपासून ते एस.एस. राजामौलीपर्यंत… प्रत्येकजण प्रभावित

‘धुरंधर २’ ची जादू केवळ बॉलीवूडमध्येच नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही उमटत आहे. बॉलीवूड स्टार्स आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, आयुष्मान खुराना आणि रितेश देशमुख यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे, तर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन आणि महेश बाबू हे देखील रणवीर सिंगच्या अभिनयाचे चाहते बनले आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि नागार्जुन यांनीही या फ्रँचायझीला सिनेमासाठी एक मोठी उपलब्धी म्हटले आहे.

 

Eye opener 👌Industry Praising DHURANDHAR is wow and the brand deserves all the accolades 👏👏industry needs to realise that ADITYA made a film and not a project,,casted actors and not instagrammars who trend at parties 👍stop making projects and and start making films👍 — ameesha patel (@ameesha_patel) March 24, 2026

बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींचा टप्पा पार

‘धुरंधर २’ ने कमाईच्या बाबतीत धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच सोमवारी, चित्रपटाने भारतात अंदाजे ६५ कोटी रुपयांची कमाई केली. यासह, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी रुपयांचा जादुई टप्पा ओलांडला आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाची जगभरातील कमाई ८४४.७६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ज्या वेगाने चित्रपट पुढे जात आहे, ते पाहता निर्मात्यांना आशा आहे की तो लवकरच १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.

‘कदाचित मी पुन्हा चालू शकणार नाही…’ रुग्णालयातून अनुराग डोभालचा वेदनादायक व्लॉग; प्रकृती अजूनही चिंताजनक

काय आहे ‘धुरंधर २’ ची कथा?

हा चित्रपट जसकिरत सिंग रंगीपासून ‘हमजा अली मजारी’ बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवतो. रणवीर सिंग एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे, जो देशावरील दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसखोरी करतो आणि लवकरच ‘शेर-ए-बलुच’ म्हणजेच लयारीचा बिनमुकुट राजा बनतो. चित्रपटातील उत्कंठा आणि ॲक्शन प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.

Web Title: Dhurandhar 2 ameesha patel slam bollywood controversy instagrammers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.