Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhurandhar 2: पहिल्याच आठवड्यात 700 कोटींचा टप्पा पार; ‘बाहुबली २’ ते ‘गदर २’ पर्यंतचे रेकॉर्ड धुळीस

आदित्य धरचा 'धुरंधर २' हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १०० कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिला हिंदी बॉलीवूड चित्रपट ठरला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 23, 2026 | 09:57 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘धुरंधर २’ ने केला 700 कोटींचा टप्पा पार
  • ‘बाहुबली २’ ते ‘गदर २’ पर्यंतचे रेकॉर्ड धुळीस
  • जाणून घ्या ‘धुरंधर २’ ची एकूण कमाई
 

आदित्य धरच्या या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट, ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ने बॉक्स ऑफिसच्या इतिहासात एक नवीन रेकॉर्ड तयार केले आहेत. चित्रपटाच्या कमाईने पहिल्या दिवसापासूनच मोठी झेप घेतली. पेड प्रिव्ह्यू वगळता, पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला बॉलीवूड चित्रपट ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस उलटले आहेत आणि त्याने जणू काही धुमाकूळच घातला आहे. या चित्रपटाने चौथ्या दिवशी, म्हणजेच रविवारी, किती कमाई केली हे आपण आता जाणून घेणार आहोत.

शनिवारपर्यंत, ‘धुरंधर २’ ने अवघ्या तीन दिवसांतच जगभरात ५०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिसवर असे स्थान मिळवले आहे, जे यापूर्वी कोणताही ब्लॉकबस्टर चित्रपट मिळवू शकला नव्हता. आता आपण चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईबद्दल जाणून घेऊ.

शिव ठाकरेने जिंकली पहिली The 50 ची ट्रॉफी; 50 लाखांचे बक्षीस मिळवणारा ‘तो’ चाहता कोण?

रविवारीही ‘धुरंधर २’ ची दमदार कमाई

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘धुरंधर २’ ने शनिवारी ₹११३.०० कोटींची कमाई केली होती, तर चौथ्या दिवशी, रविवारी, त्याच्या कमाईत वाढ होऊन ती ₹११४.८५ कोटींवर पोहोचली. शनिवारी २०,९१७ शो झाले होते, तर रविवारी शोच्या संख्येत वाढ होऊन ती २१,१५३ वर पोहोचली. या चित्रपटाने आता देशभरात एकूण ₹४५४.१२ कोटींची कमाई केली आहे.

‘धुरंधर २’ ची जगभरातील कमाई

आता आपण ‘धुरंधर २’ या चित्रपटाच्या परदेशातील कमाई आणि जगभरातील कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. या चित्रपटाने आतापर्यंत परदेशात एकूण अंदाजे ₹१४९.३२ कोटींची कमाई केली आहे. जगभरातील आकडेवारी पाहता, चित्रपटाने अंदाजे ₹६९१.३२ कोटींची (ग्रॉस) कमाई केली आहे. याचा अर्थ, हा चित्रपट ₹७०० कोटींची कमाई करण्यापासून फक्त काही कोटी दूर आहे.

‘बाहुबली २’ ने चौथ्या दिवसाच्या कमाईत मात केली

या चित्रपटाने चौथ्या दिवसाच्या कमाईत भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘बाहुबली २’ ला लक्षणीयरीत्या मागे टाकले आहे. रविवारी ‘बाहुबली २’ ने ९३.०० कोटी रुपये कमावले होते, तर ‘धुरंधर २’ ने ११४.८५ कोटी रुपये कमावून त्याला मागे टाकले.

तो सध्या नाटक करतोय; दिग्दर्शक सतीश राजवाडेंचं रंगभूमीवर कमबॅक; ‘या’ हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस

‘गदर २’ च्या लाईफटाईम कमाईला टाकले मागे

‘धुरंधर २’ ने आपल्या पहिल्याच वीकेंडमध्ये ‘गदर २’ ची लाईफटाईम कमाई पूर्णपणे धुळीस मिळवली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ‘गदर २’ ने भारतात आपल्या लाईफटाईममध्ये ₹५२५.७० कोटी (नेट कलेक्शन) आणि ₹६८६.०० कोटी (ग्रॉस) कमावले होते, तर या चित्रपटाने परदेशात केवळ ₹६५ कोटी कमावले होते. त्यामुळे, ‘धुरंधर २’ ने या चित्रपटाला पूर्णपणे नामोहरम केले आहे.

Web Title: Dhurandhar 2 box office collection day 4 total worldwide earth shattering opening weekend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
1

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
2

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
3

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
4

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.