(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉसचा माजी स्पर्धक अनुराग डोवाल सध्या एका अपघातानंतर उपचार घेत आहे. दरम्यान, त्याची पत्नी रितिका चौहानने एका मुलाला जन्म दिला आहे. तिने ही माहिती तिच्या सोशल मीडियावर दिली. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर नवजात बाळाच्या पायांचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने एक मेसेज लिहीला आहे.
रितिका चौहानने तिच्या बाळाच्या पायांचा फोटो शेअर करत लिहिले, “रामनवमीच्या पवित्र आणि शुभ मुहूर्तावर, देवाने आम्हाला त्याची सर्वात अनमोल भेट दिली आहे.” तिने बाळाच्या जन्माची अपेक्षित तारीख २७ मार्च, २०२६ असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, रितिकाने या पोस्टमध्ये तिच्या पतीला टॅग केले नाही. अनुराग डोवालनेही बाळाच्या आगमनाची जाहीर घोषणा केलेली नाही. वृत्तानुसार, अनुराग आणि रितिका यांच्या नात्यात काहीतरी बिघडले असल्याचे समजत आहे.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अनुरागच्या मुलाचा जन्म त्याच्या कुटुंबावरील गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर झाला आहे. त्याने आपल्या आई-वडिलांवर आणि भावावर मानसिक छळाचा आरोप केला आहे. त्याच्या मते, त्याचे कुटुंब त्याच्या लग्नामुळे नाराज होते. इंस्टाग्राम लाईव्ह सेशन दरम्यान अनुरागचा अपघात झाल्यावर हा वाद आणखी वाढला. त्यावेळी रितिकाने त्याला पाठिंबा दिला होता. मात्र, आता ते दोघे विभक्त झाले आहेत.
गरोदरपणात रितिकाने इंस्टाग्रामवर स्टोरीज शेअर केल्या होत्या. यामध्ये तिने सासरच्या मंडळींवरील आरोप निराधार असल्याचे सांगत कुटुंब एकसंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
अनुराग डोवालने तब्येतीबद्दल माहिती दिली.
अनुरागने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्याला वाटत होते की तो कदाचित पुन्हा कधीच चालू शकणार नाही. तो खूप भावूक दिसत होता. चाहत्यांना आशा आहे की वडील झाल्यानंतर अनुराग लवकरच त्याच्या नैराश्यातून बाहेर पडेल.






