(फोटो सौजन्य - x अकाउंट)
आज सोमवारी सकाळी ‘अनुपमा’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेच्या सेटवर आग लागल्याची बातमी समोर आली आहे, ज्याचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये घडली आहे. जिथे ‘अनुपमा’चा सेट आहे तिथेच ही आग लागल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. तसेच, आग लागताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या बातमीमुळे आता फिल्म सिटीमध्ये खळबळ उडाली आहे.
विवाहित पुरुष, लिव इन अन् मृत्यू… स्मिता पाटील- राज बब्बर यांची अशी होती Love Story
ही घटना कधी आणि कशी घडली?
सोमवारी सकाळी मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये अचानक खळबळ उडाली, जेव्हा ‘अनुपमा’ या लोकप्रिय टीव्ही शोच्या सेटवर आग लागल्याचे समजले. सेटवर आग लागताच मोठ्या ज्वाळा उठू लागल्या, ज्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. तसेच, आग लागताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले, ज्यामुळे परिस्थिती सामान्य झाली आहे. यासाठी चार अग्निशमन गाड्या, चार जंबो टँकर, एक सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी आणि तीन स्टेशन अधिकारी घटनास्थळी तात्काळ तैनात करण्यात आले. यासोबतच, आगीचे खरे कारण अद्याप कळू शकलेले नाही, ज्याचा तपास सुरू आहे. याशिवाय, कोणीही जखमी किंवा घायाळ झाल्याचे वृत्त नाही.
A fire broke out early Monday morning at the Anupama TV set located within Dadasaheb Phalke Chitranagari in Film City, Goregaon East. The blaze was reported at around 6:10 am, with the Mumbai Fire Brigade (MFB) classifying it as a Level-I fire. The incident occurred behind the… pic.twitter.com/yFo1LjAzvB
— Richa Pinto (@richapintoi) June 23, 2025
आग कशी लागली?
प्रशासन आणि पोलिसांचे पथक ‘अनुपमा’च्या सेटवर पोहोचले आहेत आणि आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच योग्य माहिती उपलब्ध होईल. दरम्यान, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने या घटनेबद्दल पोस्ट केली आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विजय देवरकोंडा अडकला अडचणीत, ‘या’ आरोपाखाली साऊथ अभिनेत्यावर तक्रार दाखल
सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणाऱ्या नेटिझन्स
अनुपमाच्या सेटवर आग लागताच सोशल मीडियावर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. या घटनेबद्दल सर्वजण चिंता व्यक्त करत आहेत. नेटकरी या व्हायरल व्हिडीओवर कंमेंट करत आहेत. भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन शो ‘अनुपमा’ आहे. यात रुपाली गांगुली मुख्य भूमिकेत आहे. २०२० मध्ये सुरू झालेल्या या शोचे दिग्दर्शन रोमेश कालरा करत आहेत. तसेच ही मालिका चाहत्यांना चांगलीच आवडत आहे.