Find out Raj Babbar's journey from his debut in Bollywood to his love affair with Smita Patil
बॉलिवूड चित्रपटापासून ते देशाच्या राजकारणापर्यंत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अभिनेते राज बब्बर यांनी स्वत: चे अढळ स्थान निर्माण केले आहे. अभिनेते राज बब्बर यांचा आज ७३ वा वाढदिवस आहे. २३ जून १९५२ रोजी उत्तर प्रदेशातल्या तुंडला जिल्ह्यात जन्मलेल्या राज बब्बर यांनी ८० च्या दशकात सिनेविश्वावर राज्य केले. अभिनय आणि राजकारण यासोबतच आणखी एका कारणामुळे राज बब्बर चर्चेत राहिले ते त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे. राज बब्बर हे चित्रपट आणि राजकीय कारकिर्दीव्यतिरिक्त स्मिता पाटील यांच्या सोबतच्या प्रेम प्रकरणमुळेही चर्चेत राहिले.
गिरीजा ओक- गोडबोले हिच्या पायाला झाली गंभीर दुखापत, उपचार सुरु; पोस्ट शेअर करत दिली माहिती
राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या लव्हस्टोरी फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर अवघ्या जगभरामध्ये माहित आहे. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची पहिली भेट १९८२ साली रिलीज झालेल्या ‘भीगी पलके’ चित्रपटाच्या सेटवरुन झाली. चित्रपटाच्या सेटवर दोघांचीही मैत्री झाली, पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं. खरंतर, जेव्हा राज आणि स्मिता हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा राज बब्बर आधीच विवाहित होते. राज स्मिता यांच्यावर इतकं प्रेम करायचे की, त्यांनी त्यांची पहिली पत्नी नादिरा यांना सोडून देत स्मितासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्या काळात त्यांच्या नात्यावर बरीच टीका झाली. पण नंतर स्मिता आणि राज यांचे लग्न झाले.
‘मला खूप लाज वाटते…’, आमिर खानबद्दल दर्शील सफारीचा भावनिक खुलासा, काय म्हणाला अभिनेता?
जेव्हा स्मिता यांनी राज बब्बर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली, त्यावेळी राज बब्बर विवाहित होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगीही होती. राज बब्बर यांचं पहिलं लग्न नादिरासोबत झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा राज यांनी त्यांची पहिली पत्नी नादिरा हिला सोडून दिले आणि स्मितासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. स्मिता यांचे आई- बाबा या निर्णयावर नाराज होते. विशेषतः स्मिता यांच्या आईने त्यांचे नाते स्वीकारले नाही. त्या म्हणाल्या की, जी मुलगी इतर महिलांच्या हक्कांसाठी लढते, ती दुसऱ्याचे घर कसे तोडू शकते. राज बब्बर यांनी १९८३ मध्ये स्मिता यांच्यासोबत लग्न केलं. प्रेग्नेंसीच्या काळामध्ये प्रसूतीनंतरच्या काही अडचणींमुळे स्मिता यांचा मृत्यू झाला.
मराठी इंडस्ट्री गाजवल्यानंतर अंकुश चौधरीच्या पत्नीचं बॉलिवूडमध्ये डेब्यू, चित्रपटाचा पोस्टर रिलीज
लग्नानंतर काही महिन्यांनी राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्यात वाद सुरू झाले. १३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिता पाटील यांनी एका मुलाला जन्म दिला. ज्याचं प्रतीक स्मिता पाटील असं नाव आहे. त्याच्या जन्मावेळीच स्मिता यांची प्रसूतीनंतरच्या काही अडचणींमुळे तब्येत बिघडली. स्मिताला खूप काही समजण्याआधीच आपल्या मुलाच्या जन्मानंतर अवघ्या १५ दिवसांनी वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी स्मिता यांनी या जगाचा निरोप घेतला. स्मिता यांच्या निधनाने राज यांना खूप मोठा धक्का बसला. स्मिताच्या निधनानंतर, राज पुन्हा त्यांची पहिली पत्नी नादिरा यांच्याकडे परत गेले. असे म्हटले जाते की, स्मिता यांची शेवटची इच्छा होती की, मृत्यूनंतर त्यांच्या अंत्ययात्रेत वधूसारखे तयार करुन त्यांची अंत्ययात्रा काढावी. स्मिता यांनी त्यांचा मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांना तसे सांगितले देखील होते. “जर मी मेले तर मला विवाहित महिलेप्रमाणे तयार कर.” अगदी त्याच पद्धतीने स्मिता यांना अंतिम निरोप देण्यात आला.