(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेता विजय देवरकोंडा अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विजय देवरकोंडा यांनी आदिवासी समुदायाच्या भावना दुखावणारी विधाने केल्याचा आरोप आहे. तसेच अभिनेत्याच्या या विधानामुळे आता लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. तसेच आता अभिनेता विजयचे याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण समोर आलेले नाही आहे.
रायदुर्गम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
‘जॉइंट अॅक्शन कमिटी ऑफ ट्रायबल कम्युनिटी’चे अध्यक्ष नेनावथ अशोक कुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दावा केला आहे की ‘रेट्रो’ चित्रपटाच्या रिलीजपूर्व कार्यक्रमादरम्यान देवेराकोंडाने केलेल्या टिप्पण्या आक्षेपार्ह होत्या. यातून आदिवासी समुदायाचा अपमान झाला आहे. सायबराबादमधील रायदुर्गम पोलिस स्टेशनमध्ये देवेराकोंडावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि यावर तपास सुरू आहे.
गिरीजा ओक- गोडबोले हिच्या पायाला झाली गंभीर दुखापत, उपचार सुरु; पोस्ट शेअर करत दिली माहिती
विजय देवरकोंडा यांनी वादग्रस्त विधाने केली
‘रेट्रो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैदराबादमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विजय देवरकोंडा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला झाला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत विजय पाकिस्तानविरुद्ध बोलताना दिसला. या भागात त्याने वादग्रस्त टिप्पणी करत म्हटले होते की, ‘जसे आदिवासी कुळे पूर्वी लढत असत, तसेच आता भारत आणि पाकिस्तान लढत आहेत.’ ‘जॉइंट अॅक्शन कमिटी ऑफ ट्रायबल कम्युनिटी’ या संघटनेला हे आवडले नाही. आणि आता अभिनेत्यावर तक्रार दाखल करण्यात आला आहे.
आदिवासी संघटना संतप्त आहेत
संघटनेने विजय यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे आणि ते आदिवासींचा अपमान असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की आदिवासी समुदायाला हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. पर्यावरण संरक्षणात त्यांची विशेष भूमिका आहे. अभिनेत्याने बोलताना वस्तुस्थिती विचारात घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.विजय देवेराकोंडा यांच्या वक्तव्यावरून आदिवासी आणि आदिवासी गटांनी राज्यभर आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी पोलिसांना तक्रारी आल्या आहेत. आता रायदुर्गम पोलिसांनी विजय देवेरकोंडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
‘मला खूप लाज वाटते…’, आमिर खानबद्दल दर्शील सफारीचा भावनिक खुलासा, काय म्हणाला अभिनेता?
अभिनेत्याचा ‘रेट्रो’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
‘रेट्रो’ हा चित्रपट कार्तिक सुब्बाराजू दिग्दर्शित आणि सूर्याअभिनीत चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. पूजा हेगडे यांनी त्यात नायिकेची भूमिका साकारली होती. चित्रपटाचा प्री-रिलीज कार्यक्रम २६ एप्रिल रोजी हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. आता अभिनेता सूर्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.