Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेघना सिंह आणि शंतनु चौधरीच्या लग्नात राजकारणी आणि सिनेतारकांची मांदियाळी; वाचा यादी

सीमा सिंह यांची मुलगी मेघना सिंह हिचे लग्न थाटामाटात पार पडले आहे. मेघना सिंह हिच्या लग्नाला मोठमोठ्या कलाकारांची आणि राजकारणी नेत्यांची हजेरी लागली होती.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 23, 2025 | 03:22 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

संगीत, परंपरा आणि भावनांनी भरलेल्या अनेक दिवसांच्या सुंदर जल्लोषानंतर, सीमा सिंह आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांची मुली मेघना सिंहचे लग्न एक भव्य आणि संस्मरणीय समारंभाने पूर्ण केले आहे. हे लग्न एकीकडे शाही होते, तर दुसरीकडे भावनांसोबत जोडलेले परिपूर्ण लग्न होते. हे सुंदर लग्न मुंबईत यशस्वी पार पडले आहे, ज्यात अनेक मोठे नेते, धार्मिक व्यक्तिमत्त्वे आणि चित्रपटसृष्टीतील तारे सहभागी झाले होते. या खास प्रसंगी मेघना सिंह आणि शंतनु चौधरी यांनी सजवलेल्या मंडपात एकमेकांचा हात धरून लग्न केले. हे लग्न पारंपरिक पद्धतीने आणि कुटूंबियांच्या उपस्थितीने पार पडले.

मेघना सिंहच्या लग्नात अश्विनी कुमार चौबे, गिरिराज सिंह, आशीष शेलार आणि आदित्य ठाकरे यांसारखे मोठे नेते उपस्थित होते. सर्वांनी नवविवाहित जोडप्याला मनापासून आशीर्वाद दिले आणि सीमा सिंह यांच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. चाहते देखील आता या दोघांना शुभेच्छा देत आहेत. तसेच, लग्नाच्या शौभामध्ये आणखी भर घातली ती भक्तिरंगाने प्रेरित जया किशोरींच्या उपस्थितीने. त्यांची उपस्थिती या लग्नाला एक पवित्र आणि भावनिक रूप देणारी होती. जेव्हा त्या लग्नात पोहोचल्या, तेव्हा सर्वांनी त्यांचा मोठा आदर केला. त्यांनी वधू- वरासह आणि त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवला आणि आपल्या प्रेमळ शब्दांनी आणि शुभेच्छांनी सर्वांचे मन जिंकले.

‘भारत योग्य उत्तर देईल…’, पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड संतप्त, सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त!

मनोरंजनाच्या क्षेत्रातूनही या लग्नात भरपूर चमक होती. चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार अनुपम खेर, दर्शन कुमार, समरीन कौर, नुपूर सनोन आणि रुपाली गांगुली या समारंभात सहभागी झाले होते. या कलाकारांच्या उपस्थितीने लग्नसोहळ्याला आणखी रंगात आली. त्यांच्या हसण्यामध्ये, आनंदात आणि उपस्थितीत लग्नाला एक सिनेमाई आठवण दिली.

मेघना सिंहने स्वतःच्या लग्नात पारंपरिक आणि आधुनिक फॅशनने लुक परिपूर्ण केला होता. ती लाल लेहंग्यात अत्यंत सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत होता. तर दुसरीकडे, नवरदेव शंतनु चौधरीही स्वतःच्या लग्नात हँडसम दिसत होता. दोघांचे लग्न कुटुंब आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत यशस्वी पार पडले आणि हे दोघे कायमचे एकमेकांचे सोबती झाले.

पहलगाम हल्ल्यानंतर दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम का झाले ट्रोल ? नेटकरी म्हणाले- ‘लज्जास्पद’

या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी सीमा सिंह यांनी सांभाळली होती. ती लग्नामध्ये खूप उत्साही आणि आनंदी दिसली. त्यांनी साखरपुढा, मेहंदी, संगीत आणि लग्नाचे प्रत्येक सोहळा थाटामाटात लक्षात ठेवण्यासारखे साजरे केले आहेत. त्यांनी त्यांच्या सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत स्वतः केले. आणि या सर्वांनी या दोघांना भरभरून शुभेच्छा आणि अभिनंदन केले आहे. हे लग्न केवळ एक विधी नव्हते, तर एक असा उत्सव होता ज्यात कुटुंब, प्रेम, परंपरा आणि आदर यांचा सुंदर संगम दिसत होता. हे त्या नातेसंबंधांचा उत्सव होता जे हृदयांना जोडतात. या जोडप्यांच्या लग्नाला नेत्यांचे आशीर्वाद आणि कलाकारांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. हे लग्न एक संस्मरणीय क्षण बनवणारे होते.

Web Title: From aaditya thackerays blessings to jaya kishoris spiritual presence and anupam khers warm wishes seema singh hosts a grand wedding for daughter meghna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Wedding
  • entertainment

संबंधित बातम्या

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
1

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Marathi Warasa: ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची स्पर्धा; टॉप ३ विजेत्यांना बक्षिसांसह कलाकारांची भेट
2

Marathi Warasa: ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची स्पर्धा; टॉप ३ विजेत्यांना बक्षिसांसह कलाकारांची भेट

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी
3

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
4

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.