(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मंगळवारी (२२ एप्रिल) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला आहे. पहलगामतील या हल्ल्यात किमान २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे आणि लोक सोशल मीडियाद्वारे आपला राग आणि संताप व्यक्त करत आहेत. सर्व देशवासीयांप्रमाणे, बॉलिवूड स्टार्सनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि भारत सरकारकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अभिनेता सोनू सूदने इंस्टाग्रामवर पोस्ट करताना पहलगामतील या दहशतवादी हल्ल्याला अमानुष म्हटले आहे. अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. सुसंस्कृत समाजात दहशतवादाला स्थान नसावे आणि हे घृणास्पद कृत्य अस्वीकार्य आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांना मी मनापासून संवेदना देतो आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो.’ असे अभिनेत्याने म्हटले आहे.
Strongly condemn the cowardly terrorist attack on innocent tourists in Kashmir’s #Pahalgam. Terrorism should not have any place in a civilized world and this dastardly act is unacceptable. My deepest condolences to the families who lost their dear ones and prayers for early…
— sonu sood (@SonuSood) April 22, 2025
कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात? नेटफ्लिक्सला पाठवली कायदेशीर नोटीस
तुषार कपूर देखील संतापला
तुषार कपूरनेही पोस्ट करून हल्ल्याबद्दल दुःख आणि संताप व्यक्त केला आहे. त्याने लिहिले, ‘पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. भारत या भित्र्यांना योग्य उत्तर देईल! ज्यांना भारताच्या उदयाची भीती वाटते त्यांना नेहमीप्रमाणे लाज वाटेल! जखमींसाठी आणि मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना! #पहलगाम.’
रवीना टंडन यांचे एकतेचे आवाहन
रवीना टंडननेही यावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. अभिनेत्रीने लिहिले, ‘ओम शांती.’ भावना, दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. पीडितांना प्रार्थना आणि शक्ती. आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी किरकोळ घरगुती वाद बाजूला ठेवून एकत्र येऊन खरा शत्रू ओळखावा.’ असं तिने म्हटले आहे.
Om Shanti. 🙏🏻🕉️🙏🏻 condolences.
Shocked and angry . No words to express the anguish. Prayers and strength to the victims . Time we all let go of petty in-house fighting , UNITE and realise the true enemy. https://t.co/zSUIGHo1QP— Raveena Tandon (@TandonRaveena) April 22, 2025
‘Kesari Chapter 2’ ने परदेशात हिट झाला की फ्लॉप? जाणून घ्या चित्रपटाची एकूण कमाई!
तसेच, विवेक ओबेरॉय यांनी आपले दुःख व्यक्त करताना म्हटले की, ‘आजचा दिवस खूप दुःखाचा आहे, कारण काश्मीरमधील भयानक दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने सगळ्यांचे मन दुखावले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या सर्व कुटुंबांना माझ्या मनापासून संवेदना आणि प्रार्थना. आता, पूर्वीपेक्षा जास्त, जगाने अशा द्वेषाविरुद्ध एकत्र उभे राहिले पाहिजे आणि शक्ती, उपचार आणि चिरस्थायी शांतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. #PeaceNotTerror’. असं अभिनेत्याने म्हटले आहे.
अभिनेत्री भाग्यश्रीने हल्ल्याबद्दल दुःख आणि धक्का व्यक्त केला आणि लिहिले, ‘निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला!’ काश्मीरमध्ये दंगलखोरांनी जे केले आहे ते पाहून माझे मन तुटले. आम्ही भारतीय पंतप्रधानांना विनंती करतो की त्यांनी हे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना शिक्षा करावी.’ असं अभिनेत्री म्हणाली आहे.